महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धुलीवंदनाच्या निमित्ताने शिकार करणारे 6 जण वनविभागाच्या ताब्यात

03:05 PM Mar 26, 2024 IST | Abhijeet Khandekar
forest department kolhapur
Advertisement

3 लाख 57 हजाराचा मुद्देमाल जप्त, राधानगरी प्रादेशिक वनविभागाची कारवाई

राधानगरी / प्रतिनिधी

राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे गावच्या डोंगरावर वन्यजीवांची शिकार करणाऱ्या सहा आरोपीच्या कडून एअरगण, बॅटरी, मोटरसायकली असा सुमारे ३ लाख ५७ हजारांचा मुद्देमाल प्रादेशिक वनविभागाच्या पथकाने रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. होळी व धुलिवंदन सणानिमित्त शिकारी आणि वनव्याच्या संशयावरून गस्त घालताना हा गुन्हा उघडकीस आला आहे.

Advertisement

राधानगरी प्रादेशिक वनविभागाच्या सरवडे परिमंडळाच्या कार्यक्षेत्रात शिकार आणि वनवा प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाचे पथक रात्रगस्त घालत असताना बारडवाडीहून खिंडी व्हरवडे गावच्या दिशेने वनविभागाचे पथक शासकिय वाहनातून जात असता खिंडी व्हरवडे गावच्यावरील डोंगरात बॅटरीचा प्रकाश झोत आणि संशयास्पद हालचाली दिसून आल्याने, जागेवर जाऊन पाहणी केली असता. तेथे मोटारसायकली आढळल्या, या ठिकाणी दबा धरून बसलेनंतर संशयित आरोपी हे मोटरसायकल जवळ आल्यानंतर रंगेहाथ सापडले. त्यांच्याकडून शिकार केलेला एक कुरतुडा पक्षी, सहा लाव्हरी पक्षी, एक एअरगण, मोबाईल, बॅटरी आणि तीन मोटरसायकली मिळून आल्या. यामध्ये राधानगरी तालुक्यातील आणाजे येथील पाच आणि ठिकपुर्ली येथील एका आरोपीला ताब्यात घेतलेआहे यामध्ये रामचंद्र पाटील,. प्रशांत दादू पाटील, मारूती केरबा जाधव, प्रदिप नारायण पाटील, अमर दिनकर इंगवले, (सर्व राहणार आणाजे), शिवाजी बापू लोकरे (ठिकपुर्ली) यांना अटक करण्यात आले आहेत.

Advertisement

सदरचा मुद्देमाल वनरक्षक फराळे यांचे ताब्यात देणेत आलेला आहे. पुढील तपास श्री. एस. बी. भाट (वनपाल सरवडे) हे करीत आहेत. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९ अन्वये ३९ चे उल्लंघन केल्याने आरोपीना जप्त मालासह चौकशीसाठी ताबेत घेणेत आलेले असून पुढील तपास चालु आहे.

सदरची कारवाई जी. गुरुप्रसाद (मा. उपवनसंरक्षक कोल्हापूर) मा. एन. एस. कांबळे (मा. सहाय्यक वनसंरक्षक, कोल्हापूर यांचे मार्गदर्शनाखाली, . विशाल पाटील (वनक्षेत्रपाल राधानगरी), . एस. बी. भाट (वनपाल सरवडे), जितेंद्र साबळे, (वनरक्षक फराळे), राधेशाम गुसिंगे (वनरक्षक कंदलगाव ), एम. डी. आंगज (वनरक्षक सरवडे) आदींनी ही कारवाई केली

Advertisement
Tags :
department kolhapurDhulivandanhuntedtarun bharat news
Next Article