For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘वीट’ दत्तक घेतात लोक

06:14 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘वीट’ दत्तक घेतात लोक
Advertisement

चीनमध्ये गेल्या काही काळात एक आश्चर्यकारक प्रकार रुढ झाला आहे. येथे अनेक लोक श्वान किंवा मांजरासारखा प्राणी ‘दत्तक’ न घेता चक्क मातीची भाजलेली वीट दत्तक घेत आहेत. अशी वीट ते दत्तक घेतात. तिला तसराळ्यात किंवा पसरट भांड्यात आडवी ठेवतात. नंतर तिच्यावर दिवसातून अनेक वेळा पाणी शिंपडतात. काही दिवसांच्या नंतर या वीटेवर हिरव्या रंगाचे शेवाळ उगवू लागते. अशा शेवाळ उगविलेल्या वीटेचे मग सोशल मिडियावर प्रदर्शन केले जाते. कित्येक लोक ही शेवाळ उगवेलेली वीट नुसती पहात बसतात. हा उपद्व्याप करण्याचे कारण काय असा प्रश्न असे न करणाऱ्यांना पडतो. त्याचे उत्तर असे दिले जाते, की हा तणाव कमी करण्याचा एक अत्यंत सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. कामामुळे निर्माण होणारा दैनंदिन तणाव आणि मानसिक अस्वास्थ्य या प्रकारामुळे दूर होते. अनेक मानसोपचार तज्ञांनीही या प्रकाराचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे. तणाव घालविण्यासाठी लोक स्वत:च असे उपाय शोधून काढत आहेत.

Advertisement

वीट ‘दत्तक’ घेऊन तिच्यावर शेवाळ उगविण्याचा आणि तणाव कमी होण्याचा संबंध काय असाही पुढचा प्रश्न आहे. त्याचेही उत्तर हा छंद जोपासणाऱ्यांकडून दिले जाते. मानसिक तणाव कसा निर्माण होतो, ती प्रक्रिया महत्वाची आहे. पुष्कळ काम केल्याने, स्वत:कडून मोठ्या अपेक्षा ठेवल्याने आणि आपल्याकडून मोठी कामगिरी झालीच पाहिजे, या भावनेने तणाव निर्माण होतो. तथापि, वीटेवर शेवाळे उगविण्याच्या प्रक्रियेत या तीन्ही बाबी घडत नाहीत. असे करण्याला कोणताही खर्च येत नाही. हे काम करताना कोणतेही उत्तरदायित्व स्वीकारावे लागत नाही. तसेच हे काम करताना कोणतीही अपेक्षा बाळगली जात नाही. साहजिकच, काहीतरी काम केल्याचे समाधान मिळते पण कोणताही तणाव येत नाही. विशेषत: युवावर्गात हे वीटेवर शेवाळे उगविण्याचे फॅड मोठ्या प्रमाणात पसरल्याचे दिसून येते. सध्या सोशल मिडियावर हा ट्रेंड बराच लोकप्रिय झाला असून त्याला 50 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. चीनमधील दोन सोशल मिडिया प्लॅटफॉर्मस्वर सध्या ट्रेंड जोरात दिसून येतो. तो दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यावरुन समाजाच्या मन:स्थितीचीही कल्पना येऊ शकते, असे काहींचे मत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.