महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

१२ डिसेंबर रोजी पेन्शन अदालत.....

04:19 PM Nov 29, 2022 IST | Rohit Salunke
Advertisement

प्रतिनिधी / विजापूर : सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत पेन्शनधारकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि पात्र असलेल्यांना पेन्शन देण्यासाठी 12 डिसेंबर रोजी विजापूर जिल्ह्यातील 14 गावांमध्ये पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती विजापूरचे जिल्हाधिकारी विजय महांतेश दानम्मनवर यांनी दिली.

Advertisement

सकाळी 11 वाजता विजापूर प्रांताधिकाऱ्याच्या उपस्थितीत तालिकोटे तालुक्यातील भंतनूर गावातील श्री मारुती मंदिरात पेन्शन अदालतिचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच इंडी प्रांताधिकाऱ्याच्या उपस्थितीत असंगिहाळ गावातील श्री बिरलिंगेश्वर मंदिरात पेन्शन अदालत होणार आहे.

Advertisement

विजापूरचे ग्रेड - टू तहसीलदारांच्या उपस्थित मडसनाळ गावातील सरकारी उच्च प्राथमिक शाळेच्या आवारात तसेच बबलेश्वरच्या शिराबुरा गावातील श्री लक्ष्मी मंदिरात आणि विविध ठिकाणी पेन्शन अदालतिचे आयोजन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
lok adalatpensionpension adalattarunbharatvijapur
Next Article