करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामासाठी पाठपुरावा करणार- चंद्रदीप नरके
कोगे व कसबा बीड येथे खडीकरण व कॉंक्रिटीकरण उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन
कसबा बीड/ वार्ताहर
करवीर तालुक्यातील कोगे व कसबा बीड येथे 2515 योजनेतूनअंतर्गत रस्ते खडीकरण , डांबरीकरण व काँक्रिटीकरण तसेच आरसीसी गटर्स बांधकाम करणे आदी विकास कामांचे करवीर चे माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या कामांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी बोलताना श्री नरके म्हणाले करवीर विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामांसाठी आपण पाठपुरावा करणार आहे. तसेच मी आमदार असताना मंजूर केलेली पाच कोटीची कामे प्रशासकीय मान्यता व वर्क ऑर्डर झाली.
नसल्यामुळे व सत्ता बदल झाल्याने निधी मिळाला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्रजी फडणवीस ,सामाजिक न्याय मंत्री गिरीश महाजन आदींच्या सहकार्याने 2.5 कोटीचा निधी सद्यस्थितीला प्राप्त झाला आहे.लोकसभा आचारसंहितामुळे विकास कामांसाठी उपलब्ध असलेला निधीतून विकास कामे सुरू आहेत .यापुढे प्रलंबित विकास कामासाठी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कसबा बीड येथे ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच शिवाजीराव वरुटे , राजाराम वरुटे, आदींच्या हस्ते वरूटे गल्लीतील रस्त्याचे नारळ वाढवून उद्घाटन करण्यात आले.यावेळी लोकनियुक्त सरपंच उत्तमराव वरुटे,उपसरपंच प्रदीप पाटील , सर्व सदस्य ,कुंभी बँकेचे संचालक पंडित वरुटे, राजाराम वरुटे, मयूर वरूटे, माजी सरपंच सर्जेराव तिबिले, प्रकाश तिबिले, पोलिस पाटील पंढरीनाथ ताशिलदार आदी उपस्थित होते. प्रस्तावना सरपंच उत्तमराव वरुटे व आभार पंडित वरुटे यांनी केले.
कोगे येथे ब्राह्मण गल्लीतील रस्त्याचे खडीकरण व काँक्रिटीकरण सरपंच सौ बनाबाई यादव,उपसरपंच नामदेव सुतार,जेष्ठ नागरिक पांडूरंग डाफळे , आदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी सरपंच सौ बनाबाई यादव, उपसरपंच नामदेव सुतार सर्व सदस्य,कुंभी कासारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन विश्वासराव पाटील, माजी संचालक भगवानराव पाटील, कुंभी बॅकेचे संचालक रणजीत पाटील, सौरभ पाटील तसेच विकास सेवा व दूध संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.प्रस्तावना व्हा. चेअरमन विश्वासराव पाटील व आभार पाटील यांनी केले.