For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा परिषद शिक्षण समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून गुरुनाथ पेडणेकर यांची निवड

जिल्हा परिषद शिक्षण समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून गुरुनाथ पेडणेकर यांची निवड
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीवर माजी शिक्षण सभापती, माजी सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक तसेच माजी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर यांची तज्ज्ञ सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी पालकमंत्री तथा बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही निवड जाहीर केली.

Advertisement

माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून गुरुनाथ पेडणेकर यांच्याकडे पाहिले जाते. शिक्षण क्षेत्रात त्यांनी माध्यमिक अध्यापक संघाचे अनेक वर्षे जिल्हाध्यक्षपद भूषविले आहे. तसेच सहकार क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सध्या ते नूतन माध्यमिक विद्यालय, इन्सुलीच्या विद्या विकास मंडळ, इन्सुली या संस्थेवर सचिव म्हणून कार्यरत आहेत. शिक्षण क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, जिल्हा परिषद शिक्षण समितीवर तज्ज्ञ सदस्य म्हणून झालेल्या त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.