For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | कुर्डु शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकते पादचाऱ्याचा मृत्यू

03:23 PM Jun 05, 2026 IST | NEETA POTDAR
solapur news   कुर्डु शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकते पादचाऱ्याचा मृत्यू
Advertisement
तरुणाचा जागीच मृत्यू झाला
कुर्डुवाडी : टेंभुर्णी-कुर्डुवाडी रस्त्यावरील कुई (ता. माढा) गावच्या शिवारात हॉटेल तुळजाईजवळ मंगळवारी रात्री एक अपघात झाला. आंतरभारती शाळेकडून घराकडे जात असलेल्या २३ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अपघात घडवून अज्ञात वाहनचालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला आहे.
संदीप रोहिदास धोत्रे (वय २३, रा. कुर्डु, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शोभा रोहिदास धोत्रे यांनी कुर्डुवाडी पोलिसांत अज्ञात वाहनाच्या अज्ञात चालकावर फिर्याद दाखल केली आहे. संदीप धोत्रे हा मंगळवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास कुई येथील आंतरभारती शाळेकडून चालत आपल्या घराकडे येत होता.
तो हॉटेल तुळजाईजवळ आला असता, टेंभुर्णीकडून कुर्डुवाडीच्या दिशेने जाणाऱ्या चालकाने निष्काळजीपणाने वाहन चालवून संदीपला धडक दिली. याबाबत फिर्यादीचे चुलत दीर यांनी फोन करून फिर्यादीला अपघाताची माहिती दिली.
माहिती मिळताच संदीपच्या आई-वडिलांनी व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या संदीपला रुग्णवाहिकेतून कुर्डुवाडी येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले,. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
Advertisement

Advertisement
Tags :

.

© Copyright, All Rights Reserved.