For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पादचारी पुलाचे काम पुन्हा लांबणीवर

01:25 PM Dec 25, 2024 IST | Radhika Patil
पादचारी पुलाचे काम पुन्हा लांबणीवर
Pedestrian bridge work delayed again
Advertisement

कोल्हापूर / विनोद सावंत : 

Advertisement

महापालिकेने निविदा काढली. ठेकेदार नियुक्त केला. स्ट्रक्चरल आराखडा तयार केला. संबंधित यंत्रणेची मंजूरीही घेतली. वाढीव बजेटनुसार जादाचे 53 लाखही जमा केले. तरीही कामाला काही सुरवात नाही. अशी स्थिती दहा महिन्यांपूर्वी भूमीपूजन केलेल्या रेल्वे फाटक येथील पादचारी उड्डाणपूलची झाली आहे. प्रत्येक वेळी नवीन नियमाचा आधार घेत पादचारी उड्डाणपूलाचे कामाला खो घालण्याचा प्रकार रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. पुलाचे काम वेल्डींग ऐवजी आता बोल्टचा वापर करावे, त्यानुसार आराखडा पाठावा असा फतवा रेल्वे प्रशासनाने महापालिकेला काढला आहे. त्यामुळे पादचारी पुलाचे काम पुन्हा लांबणीवर पडले असून नकटीच्या लग्नाला सतरा विघ्न अशी स्थिती या कामाची झाली आहे.

मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी या परिसरातून नागरीक रेल्वे रूळावरून ये जा करतात. यामध्ये रेल्वेच्या धडक बसल्याने 30 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे रेल्वे फाटक येथे पादचारी पुल प्रस्तावित केला आहे. पंरतू अनेक अडचणीमुळे या पुलाचे काम काही सुरू झालेले नाही. रेल्वे प्रशासनाने सुरक्षेतच्या कारणासाठी रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला संरक्षक भिंत बांधली आहे. त्यामुळे नागरिकांना रात्रीच्यावेळी धोकादायक असणाऱ्या परिख पूल येथून ये जा करावी लागत आहे. पावसामध्ये हा मार्गाही बंद होतो. त्यामुळे रेल्वे फाटक येथील पादचारी उड्डाणपूलचा विषय पुन्हा चर्चेत आला.

Advertisement

उड्नणपूल उभारण्यासाठी 2015 मध्ये महापालिकेने रेल्वेकडे 33 लाख 29 हजार रुपये भरले होते. यानंतर या पुलासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी मंजूर झाला. महापालिकेने मुंबई आणि पुणे रेल्वे प्रशासनाकडे पादचारी उड्डाणपूलासाठी पाठविलेले आराखडा मुंबईत पादचारी पूल कोसळल्यानंतर नवीन होणाऱ्या पादचारी पुलासाठी नियमात बदल केल्यामुळे नामंजूर करण्यात आला. यानंतर महापालिकेने कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे यांची मंजूरी घेऊन नवीन नियमानुसार आराखडा रेल्वेकडे मंजूरीसाठी पाठविला. या आराखड्याला ग्रीन सिंग्नलही मिळाला होता. यामुळे महापालिकेने लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी तत्कालिन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते रेल्वे फाटक येथे पादचारी उड्डाणपूलाच्या कामाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतला. यानंतर पादचारी पुलाचे काम सुरू होईल, अशी अपेक्षा होती. परंतू भूमिपूजन होऊन वर्ष होत आले तरी कामाला काही सुरवात झालेली नाही.

दरम्यान, पादचारी पुल नसल्याने नागरिकांना रात्रीच्यावेळी धोकादायक ठरत असलेला परिख पूलाखालून जावे लागत आहे. तर काही नागरिक जीव धोक्यात घालुन रूळावरून जात संरक्षक भिंतीवरून उडा मारून जात आहेत.

                                       वाढीव 52 लाख देऊनही कामाला मुहूर्त मिळेना

पादचारी पुलाचा जुना आराखडा दहा वर्षापूर्वीचा होता. त्यामुळे वाढीव दरानुसार महापालिकेला 52 लाख 9 हजार रूपये भरणा करावे, असे पत्र रेल्वेने मनपाला दिले. महापालिकेने याची जोडणी करून या रक्कमेचा धानदेश मंगळवारी (दि.24) रेल्वे प्रशासनाला दिला आहे. तरीही काम सुरू करू शकत नाही.

                                     पुलासाठी वेल्डींगचे नको बोल्टचा वापर करा

महापालिकेने अंतिम केलेला आराखडानुसार पुलाचे काम वेल्डींगने केले जाणारे आहे. सर्व पुलाची बांधणी ठेकेदाराकडून करून रेल्वे फाटक येथे आणून पुल जोडले जाणार होते. वेल्डींगने केलेल्या कामास मेंटनन्स वारंवार येत असल्याने रेल्वेने आता पुलाचे काम वेल्डींग ऐवजी बोल्टचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे महापालिकेला यानुसार पुन्हा आराखडा तयार करावा लागणार आहे. नवीन केलेला आराखडा पुणे येथील कॉलेज ऑफ इंजिनिअरींग यांच्या मंजूरी घेऊन अंतिम मंजूरीसाठी पुन्हा पुणे रेल्वेकडे पाठवावा लागणार आहे.

                                           मग भूमीपूजनाची घाई का?

मार्च महिन्यात ठेकेदारास वर्कऑर्डर दिली असून कामाची मुदत दीड वर्ष आहे. आराखडा मंजूरीमध्येच दहा महिने गेले. अद्यपी मंजूरी नाही. असे असताना मनपाने भूमीपूजनाची घाई का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

                                     काम सुरू होण्यासाठी लागणार महिना

पादचारी पुलाची बांधणी वेल्डींगमध्ये केली जाणार होती. त्यानुसार डिझाईन केले होते. रेल्वे प्रशासनाच्या झालेल्या नियमातील बदल झाला असून बोल्टचा वापर करणारे डिझाईन करण्याच्या सूचना रेल्वेने केल्या आहेत. त्यानुसार काम सुरू केले असून महिन्याभरात पादचारी पुलाचे काम सुरू करण्याचे नियोजन आहे.

                                                                                   नेत्रदिप सरनोबत, शहर अभियंता महापालिका

Advertisement
Tags :

.