ओटवणे मतदान केंद्रावर सकाळपासूनच शांततेत मतदान
01:13 PM May 07, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
ओटवणे । प्रतिनिधी
Advertisement
रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच ओटवणे मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या . विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर गर्दी केली होती. गावातील शेती बागायतीसह कामावर जाणाऱ्या मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावर जात मतदान केले . मतदान बुथवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस होमगार्ड तैनात करण्यात आले होते . सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अगदी खेळीमेळीत मतदान बुथवर उपस्थित होते . कडक उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदारांनीही सकाळीच जाऊन मतदान करणे पसंत केले . अशा पद्धतीने गावागावात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे .
Advertisement
Advertisement
Next Article