For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कसबा बीड भागात यशवंत बॅक निवडणूकीसाठी दुपारपर्यत शांततेत 60% मतदान

02:19 PM Dec 24, 2023 IST | Kalyani Amanagi
कसबा बीड भागात यशवंत बॅक निवडणूकीसाठी दुपारपर्यत शांततेत 60  मतदान
Advertisement

कसबा बीड प्रतिनिधी

Advertisement

गेली आठ दिवस आरोप - प्रत्यारोप करीत सत्तारुढ संस्थापक यशवंत पॅनेल व राजर्षी शाहू सतारूढ पॅनेत दुरंगी लढत सुरु आहे. या निवडणुकीसाठी एकूण 18000 सभासद असून जवळपास 4500 मयत सभासद आहेत . यामध्ये यशवंत संस्थापक सतारूढ पॅनेलचे प्रमुख एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलची बांधणी झाली व विरोधी आघाडीसाठी अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलची बांधणी होऊन या दोन पॅनेलमध्ये चुरशीची लढत आहे.

यामध्ये सत्तारूढ संस्थापक यशवंत पॅनेल कडून गेल्या पंचवार्षिक मध्ये आपण केलेल्या कार्याची व बँकेच्या विकासासाठी केलेल्या सोयी सुविधा यांची मांडणी करत प्रचाराची यंत्रणा सुरू ठेवली होती, तर विरोधी राजर्षी शाहू पॅनेलकडून गेल्या पाच वर्षांमध्ये नोकर भरती व केलेला गैरव्यवहार या आरोप - प्रत्यारोप करीत दोन्ही बाजूने अत्यंत चुरशीमध्ये प्रचार यंत्रणा राबवली होती.

Advertisement

आज रविवार मतदाना दिवशी महे, कसबा बीड, शिरोली दुमाला,व सडोली दुमाला दुपारपर्यत जवळपास 60% मतदान कसबा बीड भागातील तीन केंद्रावर झाले आहे. यामध्ये 18000 पैकी मयत 4500 कमी झाल्याने जवळपास 12000 मतदान होणार आहे. त्यामध्ये दोन्ही बाजूंचे 50% मतदान विभागणी केली तर बॅकेचा केलेला विकास व विरोधी पॅनेलचे मांडलेले मुद्दे आणि सभासदांनी प्रत्यक्ष दिलेला कौल यावर कोणते पॅनेल येणार यावर निकाल स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :

.