For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

10:58 AM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक
Advertisement

खडेबाजार पोलीस स्थानकाचा पुढाकार

Advertisement

बेळगाव : होळी व रमजानच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी येथील खडेबाजार पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. दोन्ही सण शांततेत साजरे करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. खडेबाजाराचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र, पोलीस उपनिरीक्षक आर. रामेनहळ्ळी व चौरा या अधिकाऱ्यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. रंगाचा बेरंग होऊ नये, याची काळजी घ्यावी. कोणाच्याही मनाविरुद्ध रंग लावू नये. सध्या शहरात पाणीसमस्या आहे. दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. त्याचा विचार करून रंगोत्सव शांततेने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. होळी व रमजानच्या काळात शांततेला सुरुंग लागेल, अशा गोष्टींना कोणीच थारा देऊ नये. खासकरून समाजमाध्यमावरील खोट्या बातम्यांना थारा देऊ नये, असे आवाहनही पोलीस अधिकाऱ्यांनी केले. यावेळी सतीश गौरगोंडा, अंकुश केसरकर, अजिज नुरानी, पप्पू पठाण, मोहन कारेकर, विजय आचमनी, भाऊ किल्लेकर, झिया डांगे, सुहास चौगुले आदींसह खडेबाजार पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.