For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रिड’ पद्धतीने आयोजिण्यास ‘पीसीबी’ तयार

06:33 AM Nov 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
चॅम्पियन्स ट्रॉफी ‘हायब्रिड’ पद्धतीने आयोजिण्यास ‘पीसीबी’ तयार
Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

Advertisement

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळापत्रकात बदल करण्यास तयार असून त्याअंतर्गत ज्यामध्ये भारताचा समावेश असलेल्या सामन्यांचे आयोजन संयुक्त अरब अमिरातीमध्ये केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले आहे.

याचा अर्थ असा होऊ शकतो की, ’हायब्रीड मोड’मध्ये स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते. कारण भारत सरकार सध्याच्या सामाजिक-राजकीय वातावरणात आणि राष्ट्रीय संघाच्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या संघाला पाकिस्तानमध्ये जाण्याची परवानगी देण्याची शक्यता नाही. पाकिस्तानने आयोजित केलेली शेवटची स्पर्धा ही 2023 मध्ये आशिया चषक होती, जी हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार भारताने श्रीलंकेत त्यांचे सामने खेळले होते. कारण सरकारने खेळाडूंना पाकिस्तानात प्रवास करण्याची परवानगी नाकारली होती.

Advertisement

पीसीबीला वाटते की, जरी भारत सरकारने संघाला पाकिस्तानात प्रवास करण्यास अनुमती दिली नाही, तरी वेळापत्रकात किंचित फेरबदल करता येतील आणि भारत आपले सामने दुबई किंवा शारजा येथे खेळेल, असे पीसीबीमधील एका विश्वसनीय सूत्राने सांगितले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ कोणत्याही मंडळाला त्यांच्या देशाच्या सरकारच्या धोरणाच्या विरोधात जाण्यास भाग पाडू शकत नाही आणि बीसीसीआय या प्रकरणावर अंतिम निर्णय कधी घेते हे पाहणे रंजक ठरेल. जोपर्यंत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे तोवर आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताचे जय शाह विराजमान होतील.

दरम्यान, पीसीबी पुढील आठवड्यात स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी आयसीसीवर दबाव आणत आहे. कारण सदर जागतिक प्रशासकीय समितीचे काही प्रमुख अधिकारी पुढील आठवड्यात पुन्हा लाहोरला भेट देणार आहेत. पुढील वर्षी ही स्पर्धा 19 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे, ज्याचा अंतिम सामना 9 मार्च रोजी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये होईल.

Advertisement
Tags :

.