महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पेटीएम ओएडीसी संबंधीत स्टेर्टअप घेणार विकत

06:25 AM Feb 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सध्या अडचणींचा सामना करत असलेले पेटीएम ई-कॉमर्स स्टार्टअप बिटसिला खरेदी करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार पेटीएम आणि बिटसीला यांच्यातील करार अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच पूर्ण होईल. बेंगळुरूस्थित बिटसिला हे डिजिटल कॉमर्स स्टार्टअपसाठी ओपन नेटवर्क आहे.

Advertisement

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, पेटीएम ई-कॉमर्सने आपले नाव बदलून पै प्लॅटफॉर्म केले आहे. कंपनीने सुमारे तीन महिन्यांपूर्वी नाव बदलण्यासाठी अर्ज केला होता आणि 8 फेब्रुवारी रोजी रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडून त्याला मंजुरी मिळाली.

रजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या अधिसूचनेनुसार, प्रमाणपत्राच्या तारखेपासून कंपनीचे नाव पेटीएम ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड वरून पै प्लॅटफॉर्म प्रायव्हेट लिमिटेड असे बदलले गेले आहे. कंपनी मूळत: पेटीएम ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने स्थापन करण्यात आली होती.

पेटीएम हे ओएनडीसीवरील खरेदीदार अॅप

विक्रेता-साइड अॅप म्हणून ओएडीसीमध्ये स्टार्टअपची भूमिका बिझनेस टू बिझनेस आहे, कारण ती छोट्या व्यापाऱ्यांना नेटवर्कशी जोडण्यात मदत करते. दशरथम बिटला आणि सूर्या पोक्कली यांनी 2020 मध्ये बिटशिला सुरू केली होती. तर पेटीएम हे ओएनडीसीवरील खरेदीदार अॅप आहे. बिटसिलाच्या खरेदीमुळे, पेटीएम नेटवर्कच्या विक्रेत्याकडेही पोहोचेल आणि ओएनडीसीवर आपली पकड आणखी मजबूत करेल.

ओएनडीसी म्हणजे काय?

हे विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना जोडते. ग्राहक थेट एकमेकांना ओएनडीसी नफ्यासाठी नसलेली कंपनी आहे. स्टेट बँक व एचडीएफसी या सारख्या अनेक बँका त्याचे भागधारक आहेत. या कंपनीला भारत सरकारचा पाठिंबा आहे. ओएनडीसीवर भारतभर 35 हजारांहून अधिक विक्रेते आहेत. 38 लाखांहून अधिक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article