For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेटीएमचा समभाग 7 टक्के वधारला

06:47 AM Sep 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
पेटीएमचा समभाग  7 टक्के वधारला
Advertisement

वृत्तसंस्था, मुंबई

Advertisement

भारतीय शेअर बाजारात वन97 कम्युनिकेशन (पेटीएम) यांचा समभाग बुधवारी जोरदार तेजी अनुभवत होता. युपीआय पेमेंट प्रणालीसंदर्भात मंगळवारी सरकारने केलेल्या दरासंदर्भातील बातमीचा परिणाम समभागावर सकारात्मक दिसून आला.

सदरचा समभाग बुधवारी 7 टक्के वाढत 1855 रुपये प्रतिसमभाग असा झाला होता. सदरचा समभाग 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला होता. याचदरम्यान गुंतवणूकदारांनी नफा वसुलीवर भर दिला. मंगळवारी युपीआय संबंधीत मर्चंट पेमेंट संबंधीत एमडीआर लागू होण्याच्या बातमीने कंपनीचा समभाग वधारताना दिसला. आधी ज्या व्यवहारातून कमाई होत नव्हती ती आता सरकारच्या नव्या धोरणानंतर नव्याने होणार असल्याचे सांगितले जात आहे. पेटीएमच्या महसुलात येत्या काळामध्ये व्यावसायिकांमुळे फायदा होणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.