तिमाही निकालानंतर पेटीएमचे समभाग प्रभावीत
समभागांची 8 टक्क्यांच्या घसरणीसह जवळपास 208 कोटी रुपयांचा तोटा
मुंबई :
सलग तिसऱ्या तिमाहीतील नकारात्मक निकालांमुळे, पेटीएमचे समभाग हे मंगळवारी सुमारे 8 टक्क्यांनी घसरले. सकाळच्या सत्रात तेजीने उघडले पण नंतर घसरले आणि सकाळी 11:00 वाजता ते 830 च्या नीचांकी पातळीवर पोहोचले.
दुपारी 2:00 वाजता ते 4.90 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत. चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर पेटीएमचे शेअर्स 0.68 टक्क्यांनी प्रभावीत होत 894 वर बंद झाले.
तिमाहीत 208 कोटी रुपयांचा तोटा
पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने 2024-25 आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत 208 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 220 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल 36 टक्क्यांनी घसरून 1,828 कोटी रुपयांवर आला.
6 महिन्यांत समभागांमध्ये 89 टक्क्यांची वाढ
निकाल जाहीर झाल्यानंतर, सोमवारी पेटीएमचे समभाग 0.68 टक्क्यांनी किंचित घसरून 894 वर बंद झाले. गेल्या 6 महिन्यांत 88.87 टक्के आणि एका वर्षात 13.05 टक्के. त्याच वेळी, एका महिन्यात 11.55 टक्के आणि या वर्षी 13.47 टक्के ने घसरले आहेत. कंपनीचे बाजारमूल्य 54,170 कोटी रुपये आहे.