पेटीएम : लाँच पिनशिवाय काढता येणार पैसे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशामध्ये यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) या पेमेंट प्रणालीचा वापर डिजीटल व्यवहारांसाठी मोठ्या प्रमाणात केला जात असून याचा लाभ आता इतर कंपन्याही उठविण्यासाठी पुढे आलेल्या आहेत. सरकारकडून यूपीआयमार्फत करण्यात येणाऱ्या व्यवहारांसाठी कंपन्यांना जास्तीत जास्त प्रोत्साहन दिले जाते. यूपीआय पेमेंटप्रणाली अधिक सोयीस्कर करण्यासाठी वन 97 कम्युनिकेन्शस यांच्या मालकीची फिनटेक कंपनी पेटीएमने नुकतेच नवे फिचर लाँच केले आहे. या फिचरच्या माध्यमातून ग्राहकांना पिनशिवाय रक्कम भरणे (पेमेंट) शक्य होणार आहे.
कंपनीने यूपीआय वापरकर्त्यासाठी यूपीआय लाईट ऑटो टॉपअप हे नवे फिचर सुरु केले आहे. या फिचरच्या माध्यमातून पिनशिवाय 500 रुपयांपर्यंतची रक्कम पेमेंट करता येणार आहे. दररोजची पेमेंट क्षमता 2000 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे.
कशासाठी वापरता येईल
2022 सप्टेंबरमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी कमी किमतीचे व्यवहार करणाऱ्यांसाठी यूपीआय लाईट फिचर लाँच केले होते. यूपीआय लाईट हे वॉलेटसारखे काम करते. त्यातून पिनशिवाय 500 रुपयांपर्यंतचे रक्कमेचे व्यवहार सहजपणे करता येतात. जास्तीत जास्त यामध्ये 2000 रुपये इतका बॅलन्स ठेवता येतो. या प्रणालीमार्फत ग्रॉसरी स्टोअरचे पेमेंट, सार्वजनिक वाहतुकीसाठीचे पेमेंट व इतर छोटे मोठे पेमेंट करता येणार आहे.