‘पेटीएम’ गुंतवणुकीची माहिती आता तत्काळ
वापरकर्त्यांना मिळणार एआयची मदत
वृत्तसंस्था/मुंबई
फिनटेक कंपनी पेटीएमने एआय स्टार्टअप पर्प्लेक्सिटीशी करार करण्याची घोषणा केली आहे. आता वापरकर्त्यांना पेटीएम अॅपवर एआय इंटिग्रेटेड सर्च ऑप्शन मिळणार आहे. या फीचरद्वारे, वापरकर्ते त्यांच्या स्थानिक भाषेत रिअल-टाइम माहिती आणि आर्थिक अंतर्दृष्टी मिळवू शकतील. गुरुवारी कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या फिचरमुळे वापरकर्त्यांची आर्थिक साक्षरता वाढेल. वापरकर्ते बँकिंग, गुंतवणूक, खर्चाशी संबंधित विषयांवर सहजपणे माहिती शोधू शकतील. यामुळे त्यांना वित्त संबंधित निर्णय घेण्यास मदत होणार आहे. विजय शेखर म्हणाले की, एआयमुळे लोक निर्णय घेण्याची पद्धत बदलत आहेत. त्याच वेळी, पर्प्लेक्सिटीचे सीईओ अरविंद श्रीनिवास म्हणाले की, हे तंत्रज्ञान लोकांना रिअल-टाइममध्ये विश्वसनीय माहिती प्रदान करण्यास मदत करेल. अरविंद श्रीनिवास यांनी ओपन एआयमध्ये एआय संशोधक म्हणूनही काम केले आहे. गुगल सर्च स्पर्धक पर्प्लेक्सिटीने अलीकडेच 500 दशलक्ष डॉलर्सचा निधी उभारला. यापूर्वी, कंपनीने ट्रिपअॅडव्हायझरशीही अशाच प्रकारे करार केला असल्याचे सांगितले जात आहे.