महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पेटीएम बँक : नवे मंडळ स्थापन

06:17 AM Feb 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्यक्ष विजय शेखर पायउतार :  नव्या मंडळात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन यांचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी सोमवारी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला आहे. ते बँकेचे अर्धवेळ बिगर-कार्यकारी अध्यक्ष होते. त्यांच्या राजीनाम्यानंतर बँकेचे नवे संचालक मंडळ स्थापन करण्यात आले आहे. पेटीएम पेमेंट्स बँक लवकरच नवीन अध्यक्ष नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. पेटीएमने आपल्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे.

आता सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष श्रीनिवासन श्रीधर हे बोर्डाचे सदस्य असतील. याशिवाय सेवानिवृत्त आयएएस देबेंद्रनाथ सारंगी, बँक ऑफ बडोदाचे माजी कार्यकारी संचालक अशोक कुमार गर्ग आणि सेवानिवृत्त आयएएस रजनी सेखरी सिब्बल हे देखील पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळात सामील होतील.

दोन संचालकांचा यापूर्वीच राजीनामा

पेटीएमचे संस्थापक विजय यांनी राजीनामा देण्यापूर्वी दोन स्वतंत्र संचालकांनी पेटीएम पेमेंट्स बँकेच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. बँक ऑफ अमेरिका आणि प्राइस वॉटरहाऊस कूपर्सचे माजी कार्यकारी शिंजिनी कुमार यांनी डिसेंबरमध्ये राजीनामा दिला होता. त्याचवेळी एसबीआयच्या माजी उपव्यवस्थापकीय संचालक मंजू अग्रवाल यांनीही बोर्डाचा राजीनामा दिला होता.

पीपीबीएल चार बँकांसोबत भागीदारी करेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नियामक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे आरबीआयकडून कारवाईचा सामना करत असलेल्या पेटीएम पेमेंट बँकेने आपली युपीआय सेवा सुरू ठेवण्यासाठी देशातील चार मोठ्या बँका-अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि येस बँक सामील झाल्या आहेत.

आरबीआयने पेटीएम बँकेची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली होती. आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेत ठेवी आणि इतर व्यवहारांची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे. शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी आरबीआयने याबाबत परिपत्रक जारी केले होते. गेल्या काही दिवसांत सेंट्रल बँकेलाही लोकांचे अनेक प्रश्न आले होते. त्यावर आधारित, आरबीआयने (प्रश्न-उत्तर) देखील जारी केले होते.यापूर्वी, 31 जानेवारी रोजी जारी केलेल्या परिपत्रकात आरबीआयने म्हटले होते की 29 फेब्रुवारीनंतर पेटीएम पेमेंट बँकेच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. या बँकेद्वारे वॉलेट, प्रीपेड सेवा, फास्टॅग आणि इतर सेवांमध्ये पैसे जमा करता येणार नाहीत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article