Ajit Pawar : बलसुर गावात व्यवहार बंद ठेवून अजित दादांना श्रद्धांजली
04:56 PM Jan 29, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
अजित पवार यांच्या मृत्यूच्या अफवेने राज्यभर हळहळ,
Advertisement
धाराशिव उमरगा : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती जवळ विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्र सह देशभर हळहळ व्यक्त करण्यात आली अजित पवार यांचा मृत्यू हा महाराष्ट्राच्या राजकारण व समाजकारणासाठी न भरून येणारी पोकळी निर्माण करणारी घटना घडली.
बलसुर गावात श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात राजकारणातील सर्वपक्षीय तसेच सामाजिक क्षेत्र व्यापारी व्यावसायिक शेतकरी यांच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्राचे दादा गेले दादा परत या म्हणत अनेकांनी भावुक भावना व्यक्त केल्या. यावेळी सर्व क्षेत्रात कार्यरत असलेले नागरिक उपस्थित होते.अनेकांना आपले अश्रू अनावर होऊन हळहळ व्यक्त होत होती.
Advertisement
Advertisement