For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:च्या भाषेकडे आधी लक्ष द्या !

06:38 AM Aug 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
स्वत च्या भाषेकडे आधी लक्ष द्या
Advertisement

नगरसेवक रियाज किल्लेदार यांना शुभम शेळके यांचा सल्ला

Advertisement

त. भा. प्रतिनिधी / बेळगाव

महानगरपालिकेत सीमाप्रश्नाच्या विरोधातील ठराव मांडावा यासाठी गोंधळ झाला. या गोंधळात विरोध गटातील नगरसेवक रियाज किल्लेदार यांनी माध्यमांचे लक्ष वेधण्यासाठी कर्नाटकच्या बाजूने घोषणा देत गोंधळ घातला. याला महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागाचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी झणझणीत प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून महापालिकेतील गोंधळाचा समाचार घेतला. बेळगावच्या जनतेने नगरसेवक म्हणून निवड करताना थोडातरी विचार करणे गरजेचे होते. एखाद्या जबाबदार व्यक्तीला नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत पाठविणे गरजेचे आहे. सर्वसमावेशक, सर्व जातीधर्माच्या भाषेच्या लोकांना एकत्र घेऊन बेळगावचा विकास साधणारा नगरसेवक निवडून देणे आवश्यक होते. परंतु लोकांनी गोंधळ घालणाऱ्यांना निवडून दिल्याचे त्यांनी सांगितले.

कर्नाटक सरकारने उर्दू भाषिक शिक्षकांना शिक्षक भरती प्रक्रियेतून वगळले असताना सीमाप्रश्नाला विरोध म्हणून गोंधळ घालण्यापेक्षा स्वत:च्या भाषेकडे थोडे लक्ष द्या, असा सल्ला त्यांनी नगरसेवक रियाज किल्लेदार यांना दिला.

Advertisement
Tags :

.