महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर तालुक्यातील रस्त्यांकडे लक्ष द्या

10:52 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोवा रस्त्याची त्वरित दुरुस्ती करा : विधान परिषद सदस्य डॉ. साबन्ना तळवार यांची मागणी

Advertisement

बेळगाव : शेजारील गोवा राज्यासह इतर भागांना जोडल्या जाणाऱ्या बेळगाव शहराला ये-जा करण्यासाठी असणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांची दैनावस्था झाल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे खानापूर-हल्ल्याळ, खानापूर-गोवा यासह खानापूर तालुक्यातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषद सदस्य डॉ. साबन्ना तळवार यांनी केली. प्रश्नोत्तर काळा दरम्यान गोव्याला जोडणाऱ्या रस्त्यांसह खानापूर तालुक्यातील रस्त्यांची समस्या तळवार यांनी मांडून सभागृहाचे लक्ष वेधले. जिल्ह्यातील खानापूर तालुका अत्यंत दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये बहुतांश गावे दुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. रस्त्यांअभावी नागरिकांना मोठे हाल सहन करावे लागत आहेत. अनेक गावांना रस्ते निर्माण करुन देण्यात आलेले नाहीत. तर निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पायपीट करत शिक्षणाला जावे लागत आहे. जंगलातून पायपीट करत जात असताना जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षणासाठी ये-जा करावी लागत आहे. त्याबरोबरच शेजारील गोवा राज्यातून बेळगाव शहराला येणाऱ्या व गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. असे असताना गोव्याला जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. याबरोबरच खानापूर-हल्ल्याळ, खानापूर-रामनगर रस्त्याही खराब झाला असून अनेक कामे प्रलंबित राहिली आहेत. सदर रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Advertisement

लवकरच रस्त्यांची डागडुजी

जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध असून लवकरच डागडुजी करण्यात येईल. आवश्यक ठिकाणी रस्ते निर्माण करण्यात येतील, असे सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article