For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

पावशी-कुंभारवाडीत श्रमदानातून वनराई बंधारा; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश

03:04 PM Oct 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावशी कुंभारवाडीत श्रमदानातून वनराई बंधारा  ‘पाणी अडवा  पाणी जिरवा’चा संदेश
Advertisement
कुडाळ : दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी प्रशासनाकडून गावागावांत बंधारे बांधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत पावशी-कुंभारवाडी येथील ओहळावर शुक्रवारी श्रमदानातून वनराईचा कच्चा बंधारा बांधण्यात आला. या उपक्रमातून पाणी अडवून जमिनीत जिरविण्याचा संदेश देण्यात आला.

पावशी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष तथा माजी सरपंच चंद्रकांत कुंभार, पोलीस पाटील शेखर पोखरे, गंगाराम पारकर (बोरभाट), अरविंद बिले (बेलनदी), युवा सामाजिक कार्यकर्ते अमोल पावसकर आणि कुडाळ तालुका पत्रकार समिती यांच्या संयुक्त पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.

Advertisement

पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी ते अडवून जमिनीत मुरविणे, भूजल पातळी वाढविणे आणि भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केल्याने जलसंधारणाच्या कामाला लोकसहभागाची जोड मिळाली.

या वेळी कुडाळ तालुका पत्रकार समितीचे अध्यक्ष विजय पालकर, प्रमोद म्हाडगूत, रवी गावडे, निलेश जोशी, अजय सावंत, काशिराम गायकवाड, संजय जोशी, संजय तेंडोलकर, प्रसाद राणे, अरुण अणावकर, समुदाय वैद्यकीय अधिकारी एस. डी. कुशे, ग्राम महसूल अधिकारी लता पाटील, अंगणवाडी सेविका दीपावली फोंडके, सरिता माळके, सुचित्रा भोगटे, किशोरी नालंग, अपर्णा पावसकर, आशा स्वयंसेविका राजश्री धुरी, त्रिशा शेलटे, आरोग्य सेविका मनीषा कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

सर्वांनी एकत्रितपणे श्रमदान करून बंधारा उभारला. जलसंधारणासाठी लोकसहभाग किती महत्त्वाचा आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. भविष्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अशा उपक्रमांची गावागावांत अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचा संदेशही या वेळी देण्यात आला.

Advertisement
Tags :

.