कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्रतिसरकार स्मारकाला पवारांनी दिले 25 लाख

04:18 PM Mar 06, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सातारा : 

Advertisement

सातारा शहरातील स्वातंत्र्य संग्रामाचे राष्ट्रीय स्मारक असलेल्या प्रतिसरकार स्मारकास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार शरद पवार यांनी 25 लाख रुपयांचा निधी त्यांच्या खासदार फंडातून दिले आहेत. याबाबत स्मारक समितीने खासदार शरद पवार यांच्याकडे स्मारक उभारणीसाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार हा निधी उपलब्ध केला आहे. यासोबतच जिल्हा नियोजन समितीतून आणखी निधी या स्मारकास उपलब्ध व्हावा, अशी अपेक्षा स्मारक समितीकडून होत आहे.

Advertisement

भारतीय स्वातंत्रता आंदोलन 1942 चले जाव स्वातंत्र्य संग्रामाचा अविभाज्य ऐतिहासिक घटक सातारचे प्रतिसरकार आहे. या आंदोलनाचा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्मारक उभारणीस तत्कालिन प्रधानमंत्री पी. व्ही. नरसिंहराव यांनी या स्मारकास एक कोटी शासकिय भूखंडासहित उपलब्ध करुन देण्याचे जाहीर केले होते. याबाबत केंद्र सरकारच्या स्तरावरील सुकाणू समितीने राज्यासाठी एक उपसमिती तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमली होती. तसेच हे स्मारक उभारण्यासाठी पत्रव्यवहार केला होता. तसेच हुतात्मा स्मारक सुशोभिकरण, दुरुस्ती आदी बाबींसाठी हिरक महोत्सवी वर्षात तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी 2015-16 मध्ये राज्यासहित इतर जिह्यातही निधी दिला होता. मात्र, सातारचे प्रतिसरकार स्मारक उभारणीस निधी मिळाला नाही. 2010-11 मध्ये तत्कालिन जिल्हाधिकारी एन. रामास्वामी यांनी नियोजन समितीतून 46 लाख रुपये उपलब्ध केले होते. यातून सध्याचे संरक्षक भिंत, क्रांतीस्तंभ शिल्प उभारण्यात आले. त्यानंतर हिरक महोत्सवी वर्षात स्मारकाला निधी उपलब्ध झाला नव्हता. त्यामुळे स्मारक समितीने खासदार शरद पवार यांना त्यांच्या फंडातून निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाव्दारे केली होती. त्यानुसार खासदार शरद पवार यांनी नुकताच 25 लाखांचा निधी या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी उपलब्ध केला आहे. त्यामुळे या स्मारकाचे काम मार्गी लागणार आहे. या निधीसाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी सातत्याने खासदार पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या निधीच्या उपलब्धतेबद्दल स्मारक समितीचे शिवाजी राऊत, अस्लम तडसरकर, विजय निकम, ज्ञानदेव कदम, विक्रांत पवार, मुनवर कलाल, सईद कुरेशी, आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article