For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पवन सिंह पॅरिस ऑलिंपिकसाठी ज्युरी नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड

06:33 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पवन सिंह पॅरिस ऑलिंपिकसाठी ज्युरी   नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड
Advertisement

पुणे / प्रतिनिधी

Advertisement

पुण्यातील सुप्रसिद्ध गन फॉर ग्लोरी या नेमबाजी (शूटिंग) प्रशिक्षण संस्थेचे सहसंस्थापक व नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेचे संयुक्त महासचिव पवन सिंह यांची जुलै महिन्याच्या शेवटी सुरू होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकसाठी ज्युरी अर्थात पंच म्हणून निवड झाली आहे. सलग दुसऱ्यांदा ऑलिंपिकमध्ये नेमबाजी स्पर्धेचे पंच म्हणून निवड होणारे सिंह हे पहिलेच भारतीय असून, यामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.

टोकियो ऑलिम्पकिच्या नेमबाजी स्पर्धेत पंच म्हणून काम पाहिलेले एकमेव भारतीय बनल्यानंतर पवन सिंह यावर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (आयएसएसएफ) ने पुन्हा एकदा विश्वास दाखविला असून याही वषी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ते आरटीएस (रिझल्ट, टाईम्ंिांग व स्कोअर)चे पंच सदस्य म्हणून काम पाहतील. नेमबाजी या खेळात ऑलिम्पिक खेळांमध्ये काम करणारे पवन सिंह हे एकमेव भारतीय अधिकारी आहेत. या निवडीवर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, लागोपाठ दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पंच म्हणून काम करताना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली याबद्दल मी नम्रपणे धन्यवाद व्यक्त करतो. नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन या दोघांनी माझ्या कामावर दाखविलेला विश्वास आणि मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. यावषी होत असलेले पॅरिस ऑलिम्पिक माझ्यासाठी दोन कारणांनी खास आहे. यापैकी पहिले कारण म्हणजे नेमबाजी पंच म्हणून माझे हे सलग दुसरे ऑलिम्पिक असेल. तर दुसरे कारण म्हणजे आपण या ऑलिम्पिकसाठी नेमबाजांचा सर्वांत मोठा संघ घेऊन सहभागी होत आहोत. या स्पर्धेत आपले 21 नेमबाज 27 पदकांसाठी स्पर्धेत उतरत आहेत. नेमबाजांच्या संख्येचा विचार केल्यास आपल्या खेळाडूंची संख्या ही सर्वाधिक आणि चीनच्या संघानंतर दुसऱ्या क्रमांकावर असलेली संघ संख्या असेल.

Advertisement

गगन नारंग पथकप्रमुख

माझा मित्र आंतरराष्ट्रीय नेमबाज पद्मश्री गगन नारंग यांचीदेखील भारतीय संघाचे चीफ-डी-मिशन अर्थात पथकप्रमुख म्हणून निवड झाली आहे, ही देखील माझ्यासाठी आनंदाची बाब आहे, असेही पवन सिंह यांनी नमूद केले.

Advertisement
Tags :

.