For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाऊले चालती पंढरीची वाट

10:40 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाऊले चालती पंढरीची वाट
Advertisement

माघ वारीसाठी परिसरातून वारकरी पंढरपूरला मार्गस्थ : सर्व दिंड्या 19 रोजी पंढरपुरात होणार दाखल

Advertisement

बेळगाव : येत्या 20 फेब्रुवारी रोजी माघवारी असल्याने विविध भागांतून वारकऱ्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होऊ लागल्या आहेत. हातात पताका, डोक्यावर तुळशीकट्टा, कलश, टाळ-मृदंगांचा गजर आणि भजनात तल्लीन होऊन वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील कुद्रेमनी गावची दिंडी पंढरपूरला रवाना होणार आहे. त्यानंतर इतर ठिकाणांहून दिंड्या पंढरपूरच्या वाटेवर दिसणार आहेत. तालुक्यातील कुद्रेमनी, किणये, धामणे, हंगरगा येथून दिंड्या माघवारीसाठी जाणार आहेत. कुद्रेमनीनंतर इतर ठिकाणांच्या दिंड्या वाटेवर दिसणार आहेत. पारंपरिक पद्धतीने आणि नित्यनेमाने वारकरी मार्गस्थ होणार आहेत. या दिंडीत सकाळची थंडी आणि दुपारच्या उन्हाची तमा न बाळगता वारकरी भक्तीत लीन होणार आहेत. दरवर्षी बेळगाव तालुक्यातून आषाढी आणि माघवारीसाठी दिंड्या रवाना होतात. केवळ दहा-बारा दिवसांवर आलेल्या माघवारीसाठी वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सकाळी नाष्टा, दुपारी जेवण आणि सायंकाळी पंगतीचे नियोजन ठिकठिकाणी राहणार आहे. बेळगाव परिसरातील दिंड्या पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून भुतरामहट्टी, चिकालगु•, जैनापूर, अंकली, म्हैसाळ, यल्लम्मादेवी मंदिर, भोसे, अंबडगाव, शेळकेवाडी, हत्तीद, कासेगावमार्गे पंढरपुरात 19 रोजी दाखल होणार आहेत. या दहा-बारा दिवसांमध्ये प्रवासादरम्यान कोणतीही समस्या उद्भवू नये, यासाठी दिंडीचालकांनी सर्व व्यवस्था केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

वारकऱ्यांना विठ्ठल दर्शनाची आस

Advertisement

कुद्रेमनीतून शुक्रवार दि. 9 रोजी दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. पहिल्या दिवशी आंबेवाडी आणि त्यानंतर इतर ठिकाणी वसती होणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनाची वारकऱ्यांना आस लागली आहे. मागील चौदा वर्षांपासून कोरोना काळ वगळता दिंडी अखंड सुरू आहे. शेतीची कामे पूर्ण करून वारकरी दिंडीमध्ये उत्साहाने सहभागी होणार आहेत.

-अर्जुन जांबोटकर, दिंडीचालक, कुद्रेमनी

Advertisement
Tags :

.