समस्त पावशी ग्रामस्थ वैभव नाईकांच्या पाठीशी
कुडाळ
पावशी गावातून आमदार वैभव नाईक यांना भरघोस मतदान होणार असून संपूर्ण पावशी गावातील ग्रामस्थ वैभव नाईक साहेब यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. गेल्या पाच वर्षांत पावशी ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामे आमदार वैभवजी नाईक आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून झाली आहेत. ग्रामपंचायत सचिवालय, पावशी सातेरी मंदिर चरणी हायमास्ट, पावशी शिमावाडी गणेश मंदिर शेजारी सभामंडप, पावशी एक नंबर शाळा सभामंडप, पावशी बेलनदीवाडी शाळेसमोर सभामंडप, बेलनदीवाडी धरण , ब्राम्हण देवालय, मिटक्याचीवाडी पावशी नालंगवाडी इलेक्ट्रिक ट्रान्स फार्मर, संपूर्ण पावशी गावात स्ट्रीटलाईट, सातेरी मंदिर ते हरीचौक रस्ता अशी अनेक कामे ही आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून झाली आहेत. त्यामुळे संपुर्ण पावशी गावातील ग्रामस्थांनी आमदार वैभवजी नाईक यांच्या मशाल चिन्हावर बटण दाबून यांनाच तिसऱ्यांदा आमदार बनवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री व्हावेत असाच निर्धार केला आहे असे पावशीचे उपसरपंच कांता तेली यांनी सांगितले.