जामीन रद्दविरोधात पवित्रा गौडा सर्वोच्च न्यायालयात
10:41 AM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणी जामीन रद्द करण्याच्या आदेशाबाबत फेरविचार करावा, अशी याचिका आरोपी पवित्रा गौडा हिने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. रेणुकास्वामी खून प्रकरणात अभिनेता दर्शन, त्याची प्रेयसी पवित्रा गौडा आणि इतर आरोपींना उच्च न्यायालयाने मंजूर केलेला जामीन सर्वोच्च न्यायालयाने 14 ऑगस्ट रोजी रद्द केला होता. या आदेशाबाबत फेरविचार करावा, अशी विनंती पवित्रा गौडाने केली आहे. न्यायमूर्ती जे. बी. पारधीवाला यांच्या पीठासमोर या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.
Advertisement
Advertisement