महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिहारमधील दरभंगा एम्सच्या निर्मितीचा मार्ग मोकळा

06:26 AM Dec 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाटणा:

Advertisement

बिहारच्या दरभंगा येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) निर्मितीची योजना आणखी एक पाऊल पुढे सरकली आहे. राज्य सरकारने दरभंगा येथे राज्यातील दुसऱ्या एम्सच्या निर्मितीशी निगडित प्रस्ताव केंद्र सरकारला सोपविला आहे. आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी नवी दिल्लीत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव सुधांश पंत यांना याच्याशी निगडित प्रस्ताव सोपविला. राज्य सरकारने नव्या प्रस्तावात केंद्र सरकारच्या सर्व आवश्यक अटी मान्य केल्या आहेत. यात दरभंगा एम्सला चारपदरी रस्त्याने जोडण्याचे काम देखील सामील आहे. याचबरोबर एम्स होणाऱ्या जागी जमिनीचे समतलीकरण करून वीज अन् पाणीपुरवठा बहाल करण्याची जबाबदारी राज्य सरकारकडे असणार आहे. राज्य सरकारने एम्स निर्मितीसाठी दरभंगा येथे 189 एकर जमीन निश्चित केली आहे. येथे एम्सच्या निर्मितीकरता आवश्यक सुविधांकरता राज्य सरकारने 309 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article