महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जेडीएसच्या मदतीने भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा

10:35 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जगदीश शेट्टर : जेडीएस-भाजप कार्यकर्ते एकत्रित करणार प्रचार

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात जेडीएस पक्षाची मोठी ताकद आहे. विशेषत: ग्रामीण भागात जेडीएसचे मतदार मोठ्या संख्येने आहेत. सध्या राज्यात भाजप व जेडीएस पक्षाची युती झाल्याने भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघात जेडीएस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन भाजप प्रचार करणार असल्याची माहिती भाजपचे उमेदवार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी गुऊवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेसकडून नागरिकांना गॅरंटी योजनांचे गाजर दाखविले जात आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र गॅरंटी योजनांसाठी राज्य सरकारची तिजोरी खाली केली जात आहे. याचा राज्यावर दूरगामी परिणाम होणार आहे. याचा सखोल विचार करून राज्यातील जनतेने काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे, असे आवाहन शेट्टर यांनी केले. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, हनुमंत निराणी, राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, संजय पाटील, गीता सुतार, जेडीएसचे जिल्हाध्यक्ष शंकर मुडलगी यासह इतर उपस्थित होते. जगदीश शेट्टर यांनी गुऊवारी विनायकनगर, श्रीनगर, सिंधी कॉलनी तसेच परिसरात मतदारांच्या भेटी घेऊन भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. सिंधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article