For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वेबसीरिजमध्ये झळकणार पत्रलेखा

06:24 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
वेबसीरिजमध्ये झळकणार पत्रलेखा
Advertisement

सत्यघटनेवर आधारित कहाणी

Advertisement

बॉलिवूड अभिनेत्री पत्रलेखाने स्वत:च्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनावर स्वत:ची छाप सोडली आहे. 2014 मध्ये प्रदर्शित ‘सिटीलाइट्स’द्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यातील पत्रलेखाच्या अभिनयाचे मोठे कौतुक झाले होते.

तर पत्रलेखाने त्यानंतर लव गेम्स, नानू की जानू यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती वेबसीरिजमध्ये देखील दिसून येत आहे. तिने ‘बोस : डेड/अलाइव्ह’, ‘चियर्स’, ‘बदनाम गली’, ‘फोर्बिडन लव’, ‘मैं हीरो बोल रहा हूं’ यासारख्या उत्तम सीरिजमध्ये तिने काम केले आहे.

Advertisement

पत्रलेखा आता लवकरच लव रंजन यांचा चित्रपट ‘वाइल्ड वाइल्ड पंजाब’मध्ये दिसून येणार आहे. तसेच ती नेटफ्लिक्सची आगामी सीरिज ‘आयसी 814 : द कंदहार हायजॅक’मध्ये देखील दमदार भूमिका साकारणार आहे. सत्यघटनेवर आधारित या सीरिजचे दिग्दर्शन अनुभव सिन्हा यांनी केले आहे. 24 डिसेंबर 1999 रोजी आयसी 814 या विमानाने दिल्लीहून काठमांडूसाठी उड्डाण केले होते. परंतु या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. या घटनेवरच ही सीरिज आधारित असणार आहे.

Advertisement
Tags :

.