‘फुले’ चित्रपटात पत्रलेखा -प्रतीक
चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
‘फुले’ या चित्रपटाचा ट्रेलर सादर करण्यात आला असून हा एक बायोग्राफिकल ड्रामा धाटणीचा चित्रपट ओह. या चित्रपटात अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुले यांच्या व्यक्तिरेखेत आहे. तर महात्मा ज्योतिराव फुले यांची व्यक्तिरेखा प्रतीक गांधीने साकारली आहे. फुले दांपत्याने महिलांच्या शिक्षणाकरता केलेले कार्य या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. अनंत महादेवन यांच्याकडून दिग्दर्शित या चित्रपटात महिला, दलितांचे जीवन फुलेंनी कशाप्रकारे बदलले हे दाखविण्यात आले आहे. हा चित्रपट महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीदिनी प्रदर्शित होणार आहे. 11 एप्रिल रोजी तो चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.
महिलांचे शिक्षण, विधवांना अधिकार आणि वंचित समाजाच्या कल्याणासाठी समाजसुधारक ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी कार्य केले होते. समाज सुधाराच्या या प्रवासात त्यांना अनेक प्रकारच्या संघर्षांना सामोरे जावे लागले. हा सर्व प्रवास चित्रपटात दाखविण्यात आला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांची व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याने मी अत्यंत सुदैवी ठरलो आहे. फुलेंनी स्वत:च्या पत्नीसोबत मिळून कुप्रथांना संपुष्टात आणण्यासाठी लढा दिला होता असे प्रतीकने म्हटले आहे. ज्योतिराव फुलेंसोबत सावित्रीबाईंनी देखील भारतात आधुनिक शिक्षण आणि सामाजिक समानतेचा पाया रचला होता. त्यांनी आमच्या देशात मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला होता असे पत्रलेखाने नमूद केले.