‘पत्रा-पत्री’ अभिवाचनाचा 21 रोजी वेणुग्राम अकॅडमीतर्फे प्रयोग
11:17 AM Sep 17, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : आपल्याला कोणाचे तरी पत्र येणार आहे, अशी प्रतीक्षा करण्यात गंमत असते. पत्रांमधला मजकूर बदलत जातो. परंतु आपल्याला कोणाचे पत्र आले तर आजही आनंद होतो आणि जर दोन प्रिय मित्रांनी परस्परांना पत्रे लिहिली असतील तर त्यातील मजकूर भन्नाट असणार हे नक्कीच. याच धर्तीवर पत्रा-पत्री हा अभिवाचन आणि दृकआविष्काराचा प्रयोग 21 सप्टेंबर रोजी जेएनएमसीच्या शताब्दी सभागृहात होणार आहे. वेणुग्राम अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सतर्फे हा प्रयोग होत आहे. बेळगावकरांना उत्तमोत्तम नाटकांचा आस्वाद घेता यावा, या हेतूने वेणुग्राम अकॅडमी कार्यरत आहे. या प्रयोगासाठी विद्यार्थ्यांना अत्यंत सवलतीचा दर आकारण्यात येत आहे. अधिक माहिती व देणगी प्रवेशिकांसाठी 9972046867 किंवा 9844131106 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article