महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रुग्णांनी उपचार घ्यावेत

11:47 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

डॉ. देवेगौडा यांचे डॉक्टर दिनानिमित्त मार्गदर्शन

Advertisement

बेळगाव : रुग्णांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डॉक्टरांवर विश्वास ठेवून उपचार घेतल्यास आजार बरा होण्यास वेळ लागणार नाही. यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे गरजेचे आहे, असे डॉ. देवेगौडा इमगौडन्नवर यांनी सांगितले. येथील श्री ऑर्थो अँड ट्रॉमा सेंटर येथे डॉक्टर दिनानिमित्त ते बोलत होते. सध्या माहितीचे प्रचंड स्रोत उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णांना  बरोबर व चूक याची शहानिशा करणे कठीण आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर, रुग्ण, रुग्णालय आणि समाज यांच्यातील नातेसंबंध  अवलंबिण्याची आवश्यकता आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनामुळे औषधे विकसित होत असतात. यासाठी तरुण डॉक्टरांनी सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. ताणतणाव, अडथळ्यांचा सामना करत प्रगती साधावी, चांगल्या आरोग्यासाठी व्यायामाबरोबर चांगला आहार आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. गिरीश हिरेमठ, डॉ. नवीन शेख, डॉ. हश्मा शेख, डॉ. यासीन कालकुंद्री, डॉ. निशांत, डॉ. इक्रा उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article