For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णाचा जीव टांगणीला...

05:05 PM Nov 15, 2024 IST | Radhika Patil
रक्ताच्या तुटवड्यामुळे रूग्णाचा जीव टांगणीला
Patient's life hangs in the balance due to blood shortage...
Advertisement

सीपीआरसह जिल्ह्यात चार दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा : रक्तसंकलनात चार पटीने घट

Advertisement

कोल्हापूर / इम्रान गवंडी : 
रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. रक्तादानामुळे एखाद्या गरजु रूग्णाचा जीव वाचू शकतो. पण सध्या, सीपीआरसह शहर व जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा चार पटीने घटला आहे. सर्वत्र विधानसभा निवडणुकीची सुरू असलेली धामधुम, शाळा व महाविद्यालयांना महाविद्यालयांना असलेल्या दिवाळीच्या सुट्या त्याचबरोबर निवडणूक प्रचारात व्यस्त असललेल्या सामाजिक संस्था व कार्यकर्ते यामुळे रक्तदान शिबीरे कमी झाली आहेत.

सीपीआरसह जिल्ह्यात चार दिवस पुरेल इतकाच रक्त साठा आहे. सीपीआर मध्ये सद्यस्थितीत 20 ते 25 पिशव्याच रक्तसाठा शिल्लक आहे. रक्तसंकलन कमी होत असल्याने रक्ताची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे डॉक्टर, रुग्ण व रूग्णांचे नातेवाईक चिंतेत सापडले आहेत.

Advertisement

सीपीआरसह खासगी रक्तपेढ्यांमध्ये साठा नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. काही रक्तपेढ्यांमध्ये एक दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. दिवाळी सुट्टी व निवडणुकीमुळे ऐणवेळी रक्तदाताच उपलब्ध होत नसल्याने मोठी पंचायत निर्माण होत आहे. यामुळे रूग्णाचा जीव टांगणीला लागला असुन नातेवाईकांची प्रचंड धावपळ व घालमेल होत आहे. रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन डॉक्टर करत आहेत.

सीपीआरमध्ये ऑगस्ट महिन्यात 14 शिबीरातून 903 युनिट व सप्टेंबरमध्ये 17 शिबीरातून 790 युनिट रक्त संकलन झाले होते. यानंतर ऑक्टेबरमध्ये यात घट होऊन केवळ 9 शिबीरे झाली. यातून केवळ 513 युनिट रक्ताचे संकलन झाले होते. यानंतर चालु महिन्यात आजअखेर केवळ दोनच शिबीरे झाली. यातून केवळ 90 युनिटच रक्त संकलन झाले आहे. सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, तालीम , कार्यकर्ते सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. त्यामुळे रक्दान शिबीरेच होत नसल्याचे चित्र आहे.

चार दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा
अपघातील गुंतागुंतीची शस्त्रक्रीया, विविध ऑपरेशन, प्रसुती, किंवा डायलिसिस आदी उपचारामध्ये रूग्णाला रक्ताची गरज भासते. दिवाळीसुट्टी व निवडणुकामुळे रक्तदान शिबिरे कमी झाली आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला. सध्या चार दिवस पुरेल एवढा साठा सध्या उपलब्ध आहे. नियमित कॅम्प सुरू झाल्याशिवाय टंचाई दूर होणार नसल्याचे सांगितले जात आहे.

रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज
रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तपेढ्यांमध्ये चार दिवस पुरेल एवढाच रक्त साठा आहे. रक्तदानामुळे गरजुला जीवदान मिळू शकते. रोज रुग्णांच्या नातेवाईकांकडून रक्ताची मागणी होते. मात्र, साठाच नसल्याने रक्त देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. रक्ताच्या बदल्यात रक्तदात्यांची मागणी करावी लागत असल्याचे काहीजन सांगत आहेत. त्यामुळे रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

                                 असे घटले रक्तसंकलन
महिना            झालेली शिबीरे           रक्त संकलन         रक्त घटकांचा पुरवठा
ऑगस्ट :            14                            903                      1096
सप्टेंबर :             17                            790                      1333
ऑक्टोबर :           9                            513                       989
नोव्हेंबर :            2                             134                       304

रक्तदान सर्वश्रेष्ठ दान
रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. सध्या, रक्तपेढ्यामध्ये रक्तासाठा कमी प्रमाणात आहे. शिबीरे कमी होत असल्याने संकलनही कमी होत आहे. पण गरजूंना रक्त पुरवठा केला जात आहे. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून रक्तदात्यांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा.
डॉ. राजेंद्र मदने, सहयोगी प्राध्यापक, जिल्हा रक्त संक्रमन अधिकारी, सीपीआर

Advertisement
Tags :

.