Satara District Hospital | सातारा जिल्हा रुग्णालयात व्हीलचेअर सुविधेसाठी रुग्ण नातेवाईकांवर अवलंबून
काही मदतनीस कर्मचारी उपकाराची भाषा वापरत असल्याची तक्रार
सातारा -सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना मूलभूत सुविधांसाठीही नातेवाईकांवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. रुग्णांना विविध विभागांमध्ये नेण्यासाठी व्हीलचेअरची सोय उपलब्ध असली तरी प्रत्यक्षात ती ढकलण्यासाठी कर्मचारी पुढे येत नसल्याची तक्रार नातेवाईक करत आहेत. रुग्णाला व्हीलचेअरवर बसवल्यानंतर तपासणी कक्ष, एक्स-रे विभाग किंवा डॉक्टरांकडे नेण्यासाठी नातेवाईकांनाच व्हीलचेअर ढकलावी लागत असल्याचे अनेकांनी सांगितले. काही मदतनीस कर्मचारी सहकार्य करण्याऐवजी उपकाराची भाषा वापरत असल्याचा अनुभवही रुग्णांच्या नातेवाईकांना येत आहे. त्यामुळे आधीच आजारपणामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना ताण सहन करावा लागत आहे.
जिल्हा रुग्णालयात दररोज ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने रुग्ण येत असतात. वृद्ध,अपंग आणि गंभीर रुग्णांसाठी व्हीलचेअर सेवा अत्यावश्यक असताना अशा प्रकारे नातेवाईकांवर जबाबदारी टाकली जात असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रकाराची दखल घेत डॉ. युवराज करपे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची रुग्णांना व्हीलचेअरमधून वॉर्डमध्ये नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी कर्मचाऱ्यांची वाट न पाहता स्वतःच व्हीलचेअरचा वापर करून रुग्णांना वॉर्डमध्ये नेल्याची घटना घडली. याच दरम्यान कोणीतरी या प्रकाराचे फोटो काढल्याने प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.
रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक ती पावले उचलण्यात येतील. 'रुग्णांची गैरसोय होऊ देणार नाही. घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. कोणाची चूक आढळल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. -डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्य चिकित्सक कानउघडणी करावी व रुग्णसेवा अधिक जबाबदारीने पार पाडावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांचा विश्वास दृढ राहण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.