महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राजकारणात पुढे जाण्यासाठी सहनशीलता आवश्यक

11:58 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन

Advertisement

बेळगाव : मुख्यमंत्री होण्यासाठी वेळ जुळून येणे आवश्यक आहे. योग येण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. राजकारणामध्ये सहनशीलता असेल तरच पुढे जाणे शक्य आहे. केपीसीसी अध्यक्षपद देण्याचा निर्णय हायकमांडचा असून याबाबत आपण काही बोलणार नाही, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. काँग्रेस भवन येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. गेल्या 26 वर्षांपासून आपण राजकारणामध्ये आहोत. मतदारसंघामध्ये भेट दिली नाही म्हणून आजपर्यंत कोणीही विचारले नाही. कारण, सकाळपासून सायंकाळपर्यंत आपण नागरिकांच्या संपर्कात असतो, त्यांच्या समस्या ऐकून घेऊन समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. राजकारणामध्ये आश्वासने कमी दिली तरी चालतात, मात्र खोटे बोलू नये. स्पष्टता असेल तर जनता साथ देते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

चिकोडी लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंघातील जनतेची भेट घेऊन त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. लोकसभा मतदारसंघात कामे करण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. टप्प्याटप्प्याने विकासकामे राबवून मतदारसंघाचा विकास केला जाईल. रायबाग, कुडची या मतदारसंघातील जनतेच्या समस्या ऐकून घेतल्या जातील. याबरोबरच चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड या मतदारसंघातील समस्यांकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

केपीसीसी अध्यक्षपदासाठी आपल्या नावाची चर्चा होत आहे, असे पत्रकारांनी विचारले असता हा निर्णय हायकमांडचा असून याबाबत आपण अधिक बोलणार नाही. या पदासाठी पक्षामध्ये अनेकजण इच्छुक आहेत. केपीसीसी अध्यक्ष बदलण्याचा अधिकार हायकमांडला आहे. यावर आपण अधिक भाष्य करणार नसल्याचे ते म्हणाले. बेळगाव जिल्हा आकाराने मोठा असून निगम मंडळाची अधिक पदे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या निदर्शनास आणून दिले असल्याचे त्यांनी सांगितले. बेळगाव, चिकोडी लोकसभा मतदारसंघात झालेल्या पराभव व विजयाची अंतर्गत समीक्षा सुरू आहे. यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक बुथस्तरावर सर्वेक्षण केले जात आहे. येत्या ता. पं. व जि. पं. निवडणुकांसाठी तयारी करण्यात येत असून या निवडणुका डिसेंबरदरम्यान होण्याची शक्यता आहे. यादरम्यान नवीन फळी तयार केली जाईल, असेही मंत्री जारकीहोळी यांनी सांगितले. यावेळी आमदार राजू सेठ, एपीएमसीचे माजी अध्यक्ष शिवनगौडा पाटील, काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article