‘पती पत्नी और वो दो’ 15 मे रोजी झळकणार
आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांचा आगामी कॉमेडी चित्रपट ‘पती पत्नी और वो दो“ 15 मे रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये एक पोस्टर असून यात आयुष्मान एका चित्त्यासोबत बसलेला दिसून येतो. आयुष्मान जाळ्यात तर चित्ता बाहेर असल्याचे यात दाखविण्यात आले आहे. तर पोस्टच्या कॅप्शनदाखल ‘शिकारी खुद हो गया शिकार, अब जाल में फंस गए हमारे प्रजापति पांडे, हो जाओ ‘पती पत्नी और वो दो“ के लिए तैयार“ असे म्हटले गेले आहे.
या चित्रपटात आयुष्मान, सारा, रकुल प्रीत सिंह आणि वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहेत. हा चित्रपट 2019 मध्ये प्रदर्शित ‘पती पत्नी और वो“चा सीक्वेल आहे. हा चित्रपट 4 मे रोजी प्रदर्शित केला जाणार होता, परंतु ते टाळण्यात आले होते. आम्ही अत्यंत चांगला चित्रपट निर्माण केला असल्याने घाईत त्याची कामगिरी खराब करू इच्छित नाही. सर्व कामे पूर्ण झाल्यावरच चित्रपट प्रदर्शित व्हावा अशी इच्छा असल्याचा दावा निर्मात्यांनी केला होता. पती, पत्नी और वो दो या चित्रपटाचे दिग्दर्शन मुदस्सर अजीजने केले आहे. याच्या कहाणीत ड्रामा, कॉमेडी आणि रोमान्सचे मिश्रण पाहता येणार आहे. या चित्रपटाला भूषण कुमार, रेणु रवि चोप्रा यांनी निर्मित केले आहे.