मळेवाड - कोंडुरा रस्त्याची दयनीय अवस्था
न्हावेली । वार्ताहर ( निलेश परब )
मळेवाड कोंडुरे ग्रामपंचायत हद्दीतील कोंडुरा देऊळवाडा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून सदर रस्ता मंजूर होऊन एक वर्ष होऊन वर्षभरापूर्वी उद्घाटनही करण्यात आले.या वाडीतल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सदर रस्त्याचे उद्घाटन केल्यानंतर प्रशासनाने याच गावात बरेच रस्ते बनवले पण आमच्याच वाडीच्या रस्त्याला डांबरीकरण का केले नाही ? रस्त्याची एवढी दयनीय अवस्था झाली आहे की,वाहन चालकांना गाडी चालवताना बरीच कसरत करावी लागते. रस्त्यावरून चालताना वयोवृद्ध वडिलधाऱ्या नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागतो रस्त्यावरील खडी पूर्ण उखडल्यामुळे दगडावरुन वाहन गेल्यामुळे गाडी स्लीप होते. प्रशासनाकडे निधी नाही तर मग उद्घाटन का केलं ? येथील नागरिकांच्या डोळ्यात धूळफेक का केली ? की फक्त निवडणूकीत मतं मिळविण्यासाठीच ? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी केला आहे.तरी या गंभीर बाबींकडे मळेवाड- कोंडुरे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच , ग्रामसेवक यांनी तात्काळ लक्ष घालावे असे आवाहन येथील नागरिकांनी केले आहे.