For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कणबर्गी मोठ्या तलावातील जनावरांचा रस्ता बंद करू नये

12:04 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
कणबर्गी मोठ्या तलावातील जनावरांचा रस्ता बंद करू नये
Advertisement

ग्रामस्थांची मागणी : अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा

Advertisement

बेळगाव : कणबर्गी येथील मोठ्या तलावात जनावरांसाठी रस्ता सोडण्यात आला होता. त्यामुळे गावातील शेतकरी तलावात जनावरे घेऊन जात होते. पण आता सदर रस्ता बंद करण्यासाठी काम घाती घेण्यात आले आहे. ग्रामस्थांना विश्वासात घेण्यापूर्वीच रस्ता बंद करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्ता बंद केल्यास ग्रामस्थांतून तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी सुरू झाली आहे. कणबर्गी गावात सुमारे अडीच हजारांहून अधिक जनावरे आहेत. त्यामुळे सदर जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे व त्यांना धुण्यासाठी तलाव उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती.

त्यामुळे मोठ्या तलावात जनावरांना ये-जा करण्यासाठी रस्ता सोडण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना तलावाचा लाभ होत होता. पण आता अचानक सदर रस्ता बंद करण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिकेच्या या मनमानी कारभाराबाबत शेतकरी व ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. तलावाकडे जाणारी वाट बंद केल्यास शेतकऱ्यांनी आपली जनावरे कोठे घेऊन जावीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

Advertisement

 रस्ता बंद केल्यास आंदोलन

कोणत्याही परिस्थितीत रस्ता बंद करू नये, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याच्या हालचाली शेतकऱ्यांतून सुरू झाल्या आहेत. तसेच आमदार राजू सेठ यांनीही याकडे लक्ष घालून महापालिकेला सूचना कराव्यात व शेतकऱ्यांना सोयीचा असलेला रस्ता सुरू ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.