For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झेप्टोच्या आयपीओचा मार्ग खुला, सेबीची मंजुरी

06:22 AM May 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
झेप्टोच्या आयपीओचा मार्ग खुला  सेबीची मंजुरी
Advertisement

7300 ते 9300 कोटी उभारणार : 60 ते 90 दिवसात होणार सुचीबद्ध

Advertisement

वृत्तसंस्था, नोएडा

क्विक कॉमर्स कंपनी झेप्टो यांच्या आयपीओला मंजुरी मिळाली असून येत्या काळामध्ये आयपीओच्या माध्यमातून 7300 ते 9 हजार 300 कोटी रुपये उभारण्याची योजना कंपनीने केली आहे.  शेअरबाजारातील नियामक संस्था सेबी यांची महत्त्वाची मंजुरी मिळाल्यामुळे झेप्टोचा आयपीओ सादरीकरणाचा मार्ग खुला झाला असून कंपनीने या अंतर्गत तयारीला वेग दिला आहे.

Advertisement

कधी होणार सुचीबद्ध

कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार झेप्टो आपल्या आयपीओच्या माध्यमातून 80 कोटी डॉलर्स ते 1 अब्ज डॉलर्स रक्कम उभारू शकते. भारतीय रुपयांमध्ये पाहता ही रक्कम 7500 कोटी ते 9300 कोटी रुपये इतकी होईल. याचदरम्यान झेप्टो सध्या सुधारित अर्ज प्रक्रियेबाबत तयारी करत आहे. येत्या 60 ते 90 दिवसांमध्ये कंपनी बाजारामध्ये सूचीबद्ध होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

स्पर्धेला तोंड देण्यास सज्ज

2020 मध्ये झेप्टोची सुरुवात झाली होती. ही शेअर बाजारामध्ये लिस्ट होणारी एकमेव प्युअर प्ले क्विक कॉमर्स कंपनी असणार आहे. सप्टेंबर 2024 पासूनच आयपीओ आणण्याची तयारी कंपनीने सुरू केली होती.

आधी झेप्टोची योजना 50 कोटी डॉलर उभारायची होती पण नंतर कंपनीने आयपीओच्या माध्यमातून जास्त पैसे उभारण्याचे निश्चित केले. बाजारामध्ये असणाऱ्या ब्लिंक इट, इन्स्टामार्ट, अॅमेझॉन नाऊ, फ्लिपकार्ट मिनिटस, टाटाची बिग बास्केट यासारख्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी झेप्टोला अधिक रक्कम लागणार आहे.

दररोज 25 लाख ऑर्डरची पुर्तता

एक लक्षात घ्या झेप्टो ही कंपनी यापूर्वी 15 ते 17 लाख ऑर्डर्स दररोज घरपोच करत होती. आता यामध्ये वाढ झाली असून दररोज 25 लाख ऑर्डरची डिलिव्हरी करण्याचे आव्हान कंपनीला पार पाडावे लागत आहे. या आव्हानासाठीच कंपनी आयपीओच्या माध्यमातून वरील रक्कम उभारणार आहे.

Advertisement
Tags :

.