For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग आता मोकळा

सावंतवाडी  मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग आता मोकळा
Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न अखेर निकाली लागला आहे. त्यामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात यासंदर्भात राजघराण्यात तडजोड झाली आहे.

Advertisement

सावंतवाडी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाला २०१८ मध्ये मंजुरी मिळाली होती. आमदार दीपक केसरकर यांनी यासंदर्भात आग्रही भूमिका घेतली होती. त्यानंतर २०१९ मध्ये रुग्णालयाचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यावेळी रुग्णालयासाठी २० कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र, जागेच्या वादामुळे मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे काम प्रत्यक्षात सुरू होऊ शकले नव्हते.

आमदार दीपक केसरकर यांनी हे रुग्णालय उभारण्यासाठी राजघराण्यात तडजोड घडवून आणण्याचे प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून, गुरुवारी यासंदर्भात राजघराण्यात तडजोड झाली आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जागेचा प्रश्न निकाली निघाला आहे. जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने सावंतवाडीतील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. खंडपीठात सरकारच्या वतीने ॲडव्होकेट शिरीष शिरे यांनी म्हणणे मांडले.

Advertisement

Advertisement
Tags :

.