राहुलच्या नकारामुळे ‘दिल्ली कॅपिटल्स’चे नेतृत्व अक्षर पटेलकडे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
के. एल. राहुलने संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिल्यानंतर अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आयपीएल-2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहे. राहुलने गेल्या तीन आयपीएल हंगामात लखनौ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले होते.
गेल्या वर्षीच्या लिलावापूर्वी राहुलला सोडण्यात आले होते. रिषभ पंतला सोडलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल मेगा लिलावात राहुलला 14 कोटी ऊपयांना करारबद्ध केले. संघ व्यवस्थापनाने के. एल. राहुलला संघाचे कर्णधारपद स्वीकारण्याविषयी विचारले होते, परंतु आगामी स्पर्धेत तो निव्वळ खेळाडू म्हणून संघासाठी योगदान देऊ इच्छितो, असे सूत्रांनी सांगितले.
अक्षरने नुकत्याच झालेल्या भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफीतील विजयी मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने फलंदाज व गोलंदाजी, दोन्हांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये झालेल्या इंग्लंडविऊद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी त्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.