गणेशोत्सवापूर्वी पॅचवर्कचे काम पूर्ण करा...अन्यथा उपशहर अभियंतांवर कारवाई! प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांचा इशारा
शहरात पॅचवर्कचे काम सुरु आहे. हे काम युद्धपातळीवर पुर्ण करुन गणेश उत्सवापुर्वी पॅचवर्कचे काम पुर्ण करण्याच्या सूचना प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी मंगळवारी दिल्या. तसेच गणेशोत्सवापूर्वी काम पुर्ण न झाल्यास उप-शहर अभियंता यांना जबाबदार धरुन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे संकेतही प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी दिले. मंगळवारी सकाळी आयुक्त कार्यालयात शहरातील पॅचवर्क संदर्भात प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सर्व उप शहर अभियंतांची आढावा बैठक घेतली.
प्रशासक के मंजूलक्ष्मी यांनी गणेश उत्सवाच्या अनुषंगाने शहरातील श्री गणेश आगमन, मिरवणूक मार्ग व विसर्जन मार्गावरील खड्यांचे तातडीने पॅचवर्क करावे. यासाठी खराब झालेल्या रस्त्यांसाठी 2 कोटीचा निधी प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी मंजूर केला आहे. प्रत्येक विभागीय विभागीय कार्यालयाअंतर्गत 50 लाखाच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रत्येक विभागीय कार्यालयात दोन ठेकेदार नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक ठेकेदारास 25 लाखाचे पॅचवर्क चे काम करण्यात येणार आहे. सदरची कामे युध्दपातळीवर करुन सर्व रस्ते खड्डे मुक्त करावेत अन्यथा उप-शहर अभियंता यांना जबाबदार धरुन त्यांचेवर कडक कारवाई करणार असलेचे प्रशासकांनी सांगितले. यामध्ये या सुचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, उप-शहर अभियता महादेव फुलारी, सतीश फप्पे, आर.के.पाटील, रमेश कांबळे आदी उपस्थित होते.