For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘पतंजली फूड्स’कडून 6 रुपयांचा अंतरिम लाभांश

06:46 AM Mar 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘पतंजली फूड्स’कडून 6 रुपयांचा अंतरिम लाभांश
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पतंजली फूड्स लिमिटेडने 6 रुपयांचा अंतरिम लाभांश मंजूर केला आहे. पतंजली फूड्सने जाहीर केले की, संचालक मंडळाने भारतात कंपनीच्या दोन पूर्ण मालकीच्या उपकंपन्या स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. पतंजली फूड्सने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सवर 300 टक्के अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. लाभांश 11 एप्रिल 2024 रोजी किंवा त्यापूर्वी दिला जाईल. सेबीला दिलेल्या माहितीनुसार, बाबा रामदेव यांच्या कंपनीने सांगितले की, बोर्डाच्या बैठकीत 6 रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश मंजूर करण्यात आला आहे.  2023 च्या व्यवसायाच्या नियोजनाबद्दल बोलताना बाबा रामदेव म्हणाले की, पतंजलीने येत्या 5 वर्षात एफएमसीजी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी बनण्यासाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार केले आहे.

पतंजली फूड्सचा तिसऱ्या तिमाहीचा निकाल कसा होता?

Advertisement

बाबा रामदेव यांच्या नेतृत्वाखालील पतंजली फूड्स लिमिटेडने 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 19.6 टक्के वार्षिक घट नोंदवली आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत पतंजली फूड्स लिमिटेडने 269.2 कोटीचा निव्वळ नफा कमावला होता, असे कंपनीने नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.