Satara News : पाटणच्या रामापूरमध्ये दोन महिन्यापासून पाणीटंचाई
02:03 PM May 30, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
पाटण: पाटण शहरातील रामापूर परिसरात पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य पाईपलाईनसह नळ कनेक्शनच्या पाईपा रस्त्याच्या कामामुळे फुटल्या आहेत. काही ठिकाणच्या पाईपा बदलण्यात आल्या असल्या तरी दोन महिन्यांपासून या विभागातील पाणी पुरवठा सुरळीत न झाल्याने येथे तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. ऐन उन्हाळ्यात नदीवरून तसेच पदरमोड करून पाण्याचे टँकर मागवावे लागत आहेत.
नगरपंचायत प्रशासन व संबंधित कंपनीने याकडे लक्ष देऊन सुरळीत पाणीपुरवठा कसा होईल याकडे लक्ष द्यावे. अन्यथा पाण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही रामापूर परिसरातील नागरिकांनी दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावरील पाटण रामापूरमध्ये रस्त्याच्या बाजूला जोडण्यात आलेली नवीन नळकनेक्शन, पाटण ते रामापूरपर्यंतच्या रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू आहे. या रूंदीकरणाच्या कामासाठी दुतर्फा असणारी अतिक्रमणे काढून रस्ता खुदाई करण्यात आली आहे.
रस्ता खोदताना रामापूर परिसरातील रस्त्यालगत असणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या मुख्य पाईपलाईन बरोबरच नळ कनेक्शनच्या पाईपलाईन सर्रासपणे फुटल्या आहेत. नगरपंचायत व संबंधित कंपनीमार्फत मुख्य पाईपलाईन बदलण्यात आल्या आहेत. तर काही ठिकाणी नळ कनेक्शनही देण्यात आले आहेत. मात्र बदलण्यात आलेल्या पाईपा काही ठिकाणी पुन्हा फुटल्या असून त्याद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे.
अनेक ठिकाणी नळ कनेक्शन देण्यात आले असले तरी त्या नळांना दोन महिन्यांपासून अद्याप पाणीच आलेले नाही. काही नळांना अवघे दहा ते पंधरा मिनिटेच पाणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. याठिकाणी दोन महिन्यांपासून तांत्रिक पाणी टंचाई निर्माण झाली आहे. शहरात ज्या ज्या ठिकाणी पाणी टंचाई निर्माण झाली आहे.
त्याठिकाणी नगरपंचायतीने पाण्याचे टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे अपेक्षित आहे. मात्र तसे होताना दिसत नाही नगरपंचायत आपली जबाबदारी कंपनीवर ढकलून मोकळी होत आहे. तर कंपनीने सुरू केलेला पाण्याचा टैंकरही बंद करण्यात आला आहे. पाईपलाईन दुरुस्तीसाठी संबंधित कंपनी व नगर पंचायत यांच्यात ताळमेळ नसल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
समन्वयाचा अभाव
नगरपंचायत व संबंधित कंपनी यांच्यात समन्वय नसल्याने दोन महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तक्रार केली तरी कार्यवाही झालेली नाही, स्वखचनि आम्हाला टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे, नगरपंचायत व कंपनीने याबाबत तोडगा काढावा, असे आश्वासन माजी नगरसेवक विजय टोळे यांनी केले.
नगरपंचायत व संबंधित कंपनी यांच्यात समन्वय नसल्याने दोन महिन्यांपासून पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तक्रार केली तरी कार्यवाही झालेली नाही, स्वखचनि आम्हाला टँकरद्वारे पाणी विकत घ्यावे लागत आहे, नगरपंचायत व कंपनीने याबाबत तोडगा काढावा, असे आश्वासन माजी नगरसेवक विजय टोळे यांनी केले.
Advertisement
Advertisement
