For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Patan heavy traffic | पाटण शहरात नियमांची ऐशीतैशी! बंदी असतानाही अवजड वाहनांची शहरातून सर्रास वाहतूक

01:46 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
patan heavy traffic   पाटण शहरात नियमांची ऐशीतैशी  बंदी असतानाही अवजड वाहनांची शहरातून सर्रास वाहतूक
Advertisement

                          पाटण शहरात अवजड वाहतूक पुन्हा सुरू

Advertisement

पाटण : कराड-चिपळूण राष्ट्रीयमहामार्गावरील पाटण शहरातील धांडे पुलाच्या नव्याने बांधकामासाठी शहरातील अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करून ती पर्यायी मार्गाने बळवण्यात आली आहे. साधारणतः एक महिन्यापासून अवजड वाहतूक बंद केली आहे. सुरुवातीच्या काळात काही दिवस अवजड वाहतूक बंद राहिली. सध्या पाटण शहरातून पुन्हा या अवजड वाहतुकीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याने शहरात सर्रासपणे अवजड वाहने ये-जा करत आहेत.

त्यातच माती वाहतूक करणारे डंपर देखील खुलेआम शहरातील गल्लीबोळातून धावू लागले आहेत. गल्लीबोळात चिंचोळे रस्ते असल्याने येथून चारचाकी वाहन जाणे अवघड आहे. याशिवाय गल्लीबोळात नागरिकांसह लहान मुलांची वर्दळअसते. अशावेळी एखादी दुर्घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून मातीचे डंपर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गल्लीतून जात असल्याने येथे वाहतुकीची कोंडी देखील पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी झेंडा चौकामध्ये अवजड वाहन पादचाऱ्याच्या पायावरून गेल्याने तो जखमी झाल्याची घटनाघडली होती. चिंचोळ्या गल्लीतून डंपर जाताना त्याचा अपघात होता होता बाचला होता. काही डंपरवर नंबर प्लेटदेखील दिसून येत नाही. तर काही डंपरचालक बिनापरवाना, प्रशासनाला न जुमानता डंपर सुसाट चालवत असतात, अशा तक्रारी देखील आहेत. या डंपर चालकांवर पोलीस यंत्रणेबरोबरच महसूल विभागही कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.

Advertisement
Tags :

.