For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवोलीचा पास्टर डॉमनिक डिसोझा, पत्नीची तडीपारी कायम

03:39 PM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
शिवोलीचा पास्टर डॉमनिक डिसोझा  पत्नीची तडीपारी कायम
Advertisement

तडीपारीला दिलेले आव्हान मुख्य सचिवांनी फेटाळले

Advertisement

पणजी : जबरदस्तीने धर्मांतरण आणि फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या सडये-शिवोली येथील फाईव्ह पिलर्स चर्चचा पास्टर डॉमनिक डिसोझा आणि त्याची पत्नीला उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या आदेशावरील आव्हान अर्ज संबंधित अधिकारिणी तथा राज्याच्या मुख्य सचिवांनी फेटाळला आहे. सर्व सनदशीर मार्ग संपल्याने आता डिसोझा दाम्पत्याला उत्तर गोव्यातून तडीपार होण्यावाचून तरणोपाय उरला नाही.डॉमनिक डिसोझा आणि त्याची पत्नी जुवान मास्कारेन्हस डिसोझा या दोघांनी उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी 21 मार्च 2024 रोजी त्यांना उत्तर गोव्यातून तडीपार करण्याचा जो आदेश जारी केला होता, त्याला त्यांनी राज्याच्य मुख्य सचिवांकडे दाद मागितली होती. या संबधी सुऊ असलेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने नागरिकांच्या स्वातंत्राबद्दल निर्णय घेण्यास वारंवार उशीर होणे हे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. याचिकादारांनी अंतरिम दिलासा देण्यासाठी केलेल्या अपीलबाबत 26 एप्रिलच्या आत निर्णय घ्यावा, असा आदेश मुबंई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिला होता. त्या आदेशानुसार, काल शुक्रवारी राज्याच्या मुख्य सचिवांनी या तडीपारीचा आदेश कायम ठेवला.

Advertisement
Advertisement
Tags :

.