For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पासपोर्ट साइज फोटोला 18 लाखाची किंमत

07:00 AM Aug 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
पासपोर्ट साइज फोटोला 18 लाखाची किंमत
Advertisement

जगात चाहत्यांची कुठलीच कमतरता नाही, कुणी क्रिकेटपटूचा चाहता आहे, तर कुणी अभिनेता-अभिनेत्रींचा चाहता आहे. या चाहत्यांमध्ये स्वत:च्या पसंतीच्या वलयांकित व्यक्तीशी संबंधित गोष्ट मिळविण्याची इच्छा असते. अशाचप्रकारची चढाओढ आता एका 2 इंचाच्या फोटोसाठी दिसून आली आहे. हा पासपोर्ट साइज फोटो 18 लाख रुपयांमध्ये विकला गेला आहे. हॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री मर्लिन मुन्रो आणि प्रसिद्ध बेसबॉलपटू जो डिमॅगियोच्या विवाहाशी संबंधित ऐतिहासिक फोटो अमेरिकेत एका लिलावात 21,655 डॉलर्स (सुमारे 18 लाख रुपये)मध्ये विकला गेला आहे. हा फोटो एक अमूल्य वारसा आहे, तसेच गतकाळातील रोमांचक कहाणी मांडणारा आहे. या छोट्याशा फोटोवर ‘मिस्टर बोल्ड्सना धन्यवाद आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा, मर्लिन मुन्रो डिमॅगियो असे लिहिले आहे.

Advertisement

या फोटोचा लिलाव बोस्टन येथील आरआर ऑक्शनने केला आहे. 29 जानेवारी 1954 रोजी मर्लिन मुन्रो आणि जो डिमॅगियो यांनी स्वत:च्या विवाहाच्या दोन आठवड्यांनी सॅन फ्रान्सिस्कोच्या एका संघीय कार्यालयात जपानमध्ये जाण्यासाठी पासपोर्ट तयार करवून घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी 27 वर्षीय मुन्रो (जिचे खरे नाव नॉर्मा जीन मोर्टेन्सन होते) कडे पासपोर्ट फोटो नव्हता. अशास्थितीत 40 वर्षीय जो डिमॅगियो नजीकच्या एका आर्केडमध्ये गेला आणि तेथे पूर्वीपासून असलेल्या मुन्रोच्या एका छायाचित्राच्या अनेक प्रती घेऊन परतला. त्यातील एकावर स्वाक्षरी करत मुन्रोने तो फोटो पासपोर्ट अधिकारी हॅरी ई. बोल्ड्स यांना दिला होता. परंतु हा फोटो मुन्रोच्या पासपोर्टमध्ये वापरण्यात आला नव्हता. हा फोटो बोल्ड्स यांनी जपून ठेवला होता.

दुसऱ्या पतीसोबत फोटो

Advertisement

पासपोर्ट अर्जात मुन्रोने स्वत:चे नाव ‘नॉर्मा जीन डिमॅगियो’ असे लिहिले होते आणि आपत्कालीन संपर्कासाठी पती जो डिमॅगियोचे नाव आणि पत्ता ‘2150 बीच स्ट्रीट, सॅन फ्रान्सिस्को’ नोंदविला होता. मुन्रो आणि डिमॅगियोचा हा विवाह 9 महिनेच टिकला. परंतु त्या काळातील हा ऐतिहासिक दस्तऐवज आता मूल्यवान ठरला आहे. जो डिमॅगियो हा मुन्रोच्या तीन पतींमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा होता. तिचा पहिला पती लॉस एंजिलिस पोलीस अधिकारी जेम्स डोहर्टी होता तर तिसऱ्या क्रमांकाचा पती प्रसिद्ध नाटककार आर्थर मिलर होते, मिलर यांच्यापासून मुन्रोने स्वत:च्या मृत्यूच्या काही काळापूर्वी घटस्फोट घेतला होता.

Advertisement
Tags :

.