For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शासकीय ठेकेदार प्रभाकर पोकळे यांचे निधन

शासकीय ठेकेदार प्रभाकर पोकळे यांचे निधन
Advertisement

दोडामार्ग : कोनाळ कट्टा येथील प्रसिद्ध शासकीय ठेकेदार प्रभाकर उर्फ बाप्पा अनंत पोकळे (वय ८७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी गेली दोन दशके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय ठेकेदार व्यवसायामध्ये दर्जेदार कामे केली आहेत. दोडामार्ग तालुक्यात त्यांनी अनेक शासकीय विकासात्मक कामांना गती दिली आहे. सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. सर्वांशी सौजन्याने वागणे, शांत स्वभाव, मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते.

Advertisement

येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने एक चांगला शासकीय ठेकेदार आम्ही गमावला, अशा शब्दांत राजकीय, सामाजिक, ठेकेदार आदी क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित एक मुलगी, एक मुलगा, नातवंडे, जावई असा परिवार आहे. शासकीय ठेकेदार परेश पोकळे यांचे ते वडील, तर माणगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर यांचे ते सासरे होत. सावंतवाडीचे सामाजिक कार्यकर्ते आबा केसरकर यांचे ते मामा होत.

Advertisement

Advertisement
Tags :

.