For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बस कलंडून प्रवासी किरकोळ जखमी

06:06 AM Aug 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
बस कलंडून प्रवासी किरकोळ जखमी
Advertisement

त.भा.वार्ताहर  

Advertisement

धारवाड : हुबळीहून विजापूरकडे निघालेली परिवहनेची बस गुब्बरगुंपी क्रॉसनजीक  कलंडल्याने झालेल्या अपघातात प्रवासी किरकोळ जखमी झाले. रविवारी ही घटना  घडली. बसमध्ये 30 प्रवासी हेते. अपघात घडताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना हॉस्पिटलात हलविले. नवलगुंद तालुका हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार करण्यात आले.

दरम्यान, नवलगुंदचे पोलीस निरीक्षक जनार्दन भट्रळ्ळी यांनी हॉस्पिटलला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यामुळे बस कलंडल्याचे प्राथमिक तपासातून समजून आले असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.