Kolhapur airport | कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टीवर विमान आदळल्याने प्रवाशांमध्ये घबराट; विमानतळ प्रशासनाचे 'हे' आहे स्पष्टीकरण
कोल्हापूर विमानतळावरील नाईट लँडिंग सुविधेवर प्रश्नचिन्ह
गोकुळ शिरगाव - नवी मुंबई ते कोल्हापूर विमानसेवेदरम्यान रविवारी रात्री ६४ प्रवाशांना घेऊन येणारे विमान कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीवर उतरत असताना त्याचे चाक जमिनीवर जोरात आदळले. या लैंडिंगमुळे विमानाला मोठा हादरा बसल्याचे यावेळी प्रवाशांनी सांगितले. या संदर्भात कोल्हापूर विमानतळ प्रशासनाचे अधिकारी शिंदे यांना विचारले असता त्यांनी कोल्हापूरविमानतळाची नाईट लैंडिंगसुविधा एकदम भक्कम असून यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, यासाठी आमचे नेहमी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले.
शिंदे म्हणाले, सध्या कोल्हापूर विमानतळावर विमानाच्या फेऱ्या वाढत असून लवकरच हे विमानतळ मोठी झेप घेईल.या विमानतळाची प्रगती मोठ्या प्रमाणात चालू असून रात्री झालेला प्रकार हा फारसा धक्कादायक नसून आपण विमानातील प्रवाशांबरोबररात्री झालेल्या लेंडिंग संदर्भातसकाळपासूनच चर्चा करत असून त्यांचा गैर समज दूर करत आहोत. विमान लैंडिंग करतअसताना पायलटला अंदाजआल्याबरोबर त्यांनी ताबडतोब विमान गो अराउंड करून पुन्हा लैंड केले. त्यामुळे नाईट लैंडिगसुविधेला कुठेही बाधा येणार नसून यामध्ये जास्तीत जारत सुधारणा करून या ठिकाणी विमानाच्या फेऱ्या कशा वाढतील व विमानतळ विस्तारीकरण मोठे होऊन कोल्हापूरचे नाव उज्ज्वल करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
या घटनेनंतर लगेचच रविवारीरात्री, लैंडिंगनंतर अर्ध्या तासातच या विमानाने ७० प्रवाशांना घेऊन पुन्हा नवी मुंबईच्या दिशेने यशस्वी उड्डाण केले. मात्र, या घटनेमुळे कोल्हापूर विमानतळावरील नाईट लैंडिंगच्या सुविधा आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच कोल्हापुरात उतरणारे विमान तांत्रिक कारणास्तव गोव्यातील मोपा विमानतळावर वळवण्यात आले होते. विमानतळ प्रशासनाने नाईट लैंडिंगसाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजनांची पुन्हा एकदा काटेकोर तपासणी करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून केली जात आहे.